Saturday 6 May 2023

भव्य मोफत आरोग्य निदान, नेत्र चिकीत्सा आणि दंत तपासणी शिबीर संपन्न !

भव्य मोफत आरोग्य निदान, नेत्र चिकीत्सा आणि दंत तपासणी शिबीर संपन्न !

 औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ६ :  अजिंठा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल हडको कॉर्नर व लोकूत्तर  बौद्ध विहार चौका यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक 06 मे 2023 रोजी बौद्ध पौर्णिमाचे औचित्य साधून लोकुत्तर बौद्ध विहार चौका येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीरात अजिंठा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, आरव पॅथॉलॉजी आणि गणपती दंत रुग्णालय यांच्या मार्फत तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करण्यात आली होती. शिबीरात जवळपास 700 शिबीरार्थीनी उपस्थिती लावली. शिबीरामध्ये  महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय उपस्थिती होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

मोफत आरोग्य तपासाणी शिबीराचे उदघाटन डॉक्टर प्रवीण चाबुकस्वार, डॉक्टर जया चाबुकस्वार, डॉक्टर शीतल पाटील, डॉक्टर अनिकेत बडवे  यांच्या मार्फत करण्यात आले. विविध प्रकारच्या  सुविधा आणि आवश्यक निवडक रुग्णांना मोफत उपलब्ध करण्यात आल्या होत्या. तसेच एक्स रे , 2 डी इको आणि सोनोग्राफी ( X-Ray, 2D Echo and Sonography) चाचण्या ख़ास सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आल्या होत्या. मोफत शारिरीक आरोग्य तपासणी , रक्तगट तपासणी, नेत्र तपासणी आणि दंत चिकीत्सा इ सुविधाही शिबीरार्थीना उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या.

शिबीरात खासकरुन अपचन , पोटाच्या तक्रारी, डायबेटीज आणि सकस आहार याविषयीही तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात येत होते.  अजिंठा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि गणपती दंत रुग्णालय मधील तज्ञ  डॉक्टरांमार्फत आरोग्यविषयी विशेष टिप्स देण्यात येत होत्या. निरोगी आरोग्य जगण्यासाठी सतत आरोग्य तपासणी, व फॅमिली डॉक्टरशी सल्ला मसलत आवश्यक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

 चौका येथील नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्ह्णून  अशा प्रकारचे आरोग्य शिबीर सात्यताने आयोजित करण्यात येतील असे आयोजकांमार्फत आश्वासित करण्यात आले. शिबीरात सर्व सहकारी आणि सह प्रायोजक संस्थेमार्फत आरोग्य अधिकारी आणि तज्ञ डॉक्टरांचा सह्भाग विशेष उल्लेखनिय होता. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

अजिंठा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल व लोकुत्तर बुद्ध विहार चौका यांच्या सहयोगाने शिबीरात मोफत नेत्र तपासणी सेवा उपलब्ध करण्यात आली होती. तज्ञ नेत्र चिकित्स्क आणि डॉक्टर यांच्यामार्फत 270 रुग्णांची तपासणी करुन जवळपास 42 रुग्णाँना नेत्र शस्त्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली. आयोजकाच्या वतीने जवळपास 50 जणांचे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे.

  मोफत शिबिर यशस्वीतेसाठी प्रामुख्याने कर्मचारी , विध्यार्थी , स्वयंसेवक , अजिंठा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आणि त्यांचे पथक , तसेच स्थानिक नागरीक यांचा सहभाग होता. डॉक्टर प्रवीण चाबुकस्वार, डॉक्टर जया चाबुकस्वार यांनी इतर मान्यवर यांचे आभार मानून शिबीराची यशस्वीपणे सांगता झाली.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...