Saturday 6 May 2023

अडूर येथील "श्री देव पडयाळ" मंदिर जीर्णोद्धार व सभागृह उद्घाटन सोहळ्यानिमित्त १० ते १३ मे २०२३ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन !

अडूर येथील "श्री देव पडयाळ" मंदिर जीर्णोद्धार व सभागृह उद्घाटन सोहळ्यानिमित्त १० ते १३ मे २०२३ रोजी  विविध कार्यक्रमांचे आयोजन !

[ कोकण / गुहागर  : उदय दणदणे ]

        गुहागर तालुक्यातील अडूर (पडयाळ वाडी) ग्रामस्थांनी गेली अनेक वर्ष पाहिलेलं स्वप्न आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम, सहकार्याने अडूर गावचं जागृत देवस्थान तसेच ग्रामस्थांचे श्रद्धास्थान "श्री देव पडयाळ" मंदिराचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून, दिनांक १० ते १३ मे २०२३ या दरम्यान "श्री देव पडयाळ"  मंदिराचा जीर्णोद्धार व  सभागृह उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ४ दिवसीय नियोजित सोहळ्यात धार्मिक तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक- १० मे २०२३ रोजी सकाळी ७ वा. कलश मिरवणूक, सकाळी- ११ वा. मंदिर व सभागृह उद्घाटन, त्यानंतर प्रमुख अतिथी व मान्यवरांचा  सत्कार समारंभ, रात्री ०७-३० वा.श्री सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ( वेळणेश्वर) यांच सुस्वर भजन, आणि  रात्री -१० वा. महाराष्ट्राची लोककला सादरकर्ते कु.सहज दिनेश सोलकर, तसेच दिनांक-११ मे २०२३ रोजी  सकाळी- ०९ ते ११ वा. मुर्तींची प्राणप्रतिष्ठा, होम हवन आणि कलश रोहण समारंभ. रात्री- ०७-३० वा. गंगामाता प्रासादिक भजन मंडळ ( कोंडकारूळ) यांच सुस्वर भजन, रात्री -१० वा. नमन कार्यक्रम (जुनी तीन गावकी नमन मंडळ) अडूर, तर शुक्रवार दिनांक - १२ मे २०२३ रोजी दुपारी ०२ ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत -हळदीकुंकू समारंभ- (पडयाळवाडी महिला मंडळ ) अडूर, रात्री -१० वा. सांस्कृतिक कार्यक्रम-पडयाळवाडी महिला मंडळ आणि लहान मुले  नृत्यकला (डान्स) तसेच शनिवार दिनांक- १३ मे २०२३ रोजी सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी -१२-३० ते ०३ वा. महाप्रसाद-भंडारा, रात्री ०७ वा. भजन- विठ्ठलाई देवी प्रासादिक भजन मंडळ(अडूर)  रात्री -०९ वा.भजन- बंड्यामारुती प्रासादिक भजन मंडळ (अडूर), तर रात्री-१० वाजता महिलांचा डबलबारी (भजनांचा जंगी सामना) बुवा- योगिता पवार ( कर्दे-कुडाळ) आणि बुवा- ऋतुजा पाळेकर (देवगड) यांच्यात हा भजनाचा रंगतदार सामना आयोजित करण्यात आला आहे.अशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली असून भाविकांनी उपरोक्त सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार, मित्रमंडळीसह उपस्थितीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव पडयाळवाडी  ग्रामस्थ मंडळ/ मुबंई मंडळ आणि महिला मंडळ, अडूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...