Monday, 29 May 2023

किरीट सोमय्या यांनी माझी नाहक केली बदनामी - अनिल परब

किरीट सोमय्या यांनी माझी नाहक केली बदनामी - अनिल परब 

*अनिल परब यांच्याकडून किरीट सोमय्या यांचा समाचार*


मुंबई, प्रतिनिधी : दापोलीतील साई रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे आहे. विनापरवाना रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात सोडण्यात आले आहे. तसेच रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. आघाडी सरकार असताना हे प्रकरण सत्र न्यायालयात गेले होते. हरित लवादाकडेही या संदर्भात तक्रार करण्यात आली होती. हरित लवादाने यात तथ्य नसल्याचे सांगत याचिका निकाली काढली. यानंतर दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणाची हरित लवादाकडील याचिका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मागे घेतली. 

अनिल परब यांनी त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन खरपूस समाचार घेतला. साई रिसॉर्टशी माझा संबंध नाही असे मी सातत्याने सांगत होतो. मात्र मला दोन वर्ष बदनाम करण्यात आले. आता प्रकरण अंगलट येणार असे, लक्षात येताच माघार घेतली. सोमय्यांनी पळवाट काढली असली तरी एकवेळ नाक घासून माफी त्यांना मागावीच लागेल किंवा शंभर कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा द्यावा लागेल, असे परब म्हणाले.

No comments:

Post a Comment

पंचरत्न मित्र मंडळ चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा !

पंचरत्न मित्र मंडळ, चेंबुर तर्फे जागतिक महिला दिन चेंबुर येथे उत्साहात साजरा ! मुंबई, (शांताराम गुडेकर) :         समाजात विविध क...