Sunday 7 May 2023

रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे शांतता व संघर्ष निराकरण परिषद संपन्न !

रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे शांतता व संघर्ष निराकरण परिषद संपन्न !

कल्याण, सचिन बुटाला : रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणतर्फे शांतता व संघर्ष निराकरण परिषद शुक्रवारी (ता. ५) संध्याकाळी साडेपाच वाजता के. सी. गांधी सभागृह, बैलबाजार, कल्याण (प) येथे आयोजित करण्यात आलेली आहे.

समाजातील वाद कमी होऊन शांतता नांदावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या संकल्पनेवर आधारीत ठाणे जिल्ह्यात पहिल्यादांच अशी परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती रोटरी क्लब ॲाफ न्यू कल्याणचे अध्यक्ष डॉ. सुश्रुत वैद्य यांनी दिली. या परिषदेसाठी आतंरराष्ट्रीय कीर्तीचे वक्ते उपस्थित राहिले. नॉर्वे येथील एरिक सॉलमेन (ऑनलाईन), उच्च न्यायालयाचे न्यायाधीळ श्रीराम मोडक, डीसीपी सचिन गुंजाळ, ब्रिगेडिअर आनंद ठाकूर, शांतता कमिटीचे किशोर देसाई, रोटरी शांतीदूत सागर गांगुर्डे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पारंपरिक पद्धतीने दीप प्रज्वलित करून परिषदेची सुरुवात झाली. तसेच बुद्ध प्रतिमेचे पूजन भन्ते धम्मप्रिय यांच्या हस्ते झाले. उपस्थित वक्ते विविध क्षेत्रांतील असल्यामुळे परिषद रंगतदार झाली. केदार पोंक्षे व सुकन्या जोशी यांनी मॉडरेटरचे काम केलं.

No comments:

Post a Comment

डोंबिवली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. रतन टाटा आणि कै. कैकई घारडा (घारडा केमिकल्स) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

डोंबिवली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. रतन टाटा आणि कै. कैकई घारडा (घारड...