वस,ई विरार, मिरा भाईंदर अंगणवाडी सेविकांचे रखडलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा...
*शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्या प्रयत्नांना आले यश वसई विरार, मिरा भाईंदर अंगणवाडी सेविकांचे मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा...*
वसई, प्रतिनिधी : एकात्मिक बाल- विकास सेवा योजना मिरा भाईंदर व वसई विरार या दोन प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेळेवर व दरमहा मानधन मिळावे म्हणून शासनाने “पीएफएमएस” प्रणाली अंतर्गत मानधन देण्याची आयुक्त स्तरावर यंत्रणा तयार केल्याने काही महिने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना नियमित मानधन मिळाले; मात्र मार्च २०२३ पासून शासन स्तरावरून मानधन न मिळाल्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून दोन- दोन महिने मानधन मिळत नसल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जगायचे कसे? असा संतप्त सवाल सेविका मदतनीस करत होत्या
शासनास हवी असलेली सर्वस्तरावरील माहिती जमा करुन शासन दरबारी पोहोचवायचे काम करत असतांना कोविड सारख्या जागतिक महामारीत देखिल जिवाची पर्वा न करता कर्तव्य म्हणून शहरात तसेच गांवा- गांवात सर्व स्तरावर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर मानधनासाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने शासकीय धोरणांविषयी नाराजीचा सूर निघत असल्याचे तालुक्यासह, जिल्हा, राज्यातून दिसत होते.
अंगणवाडी सेविका मदतनिस यांचे कार्य मोठे असुन त्यांची समस्या रूचिता नाईक यांनी जाणून घेतल्या. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब नेहमी अंगणवाडी सेविका मदतनिस यांचा पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.
अनेक वर्षापासुन मानधन वाढीची समस्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री होताच मार्गी लावली हि आलेली समस्या हि लवकरात लवकर मार्गी लावू असे रूचिता नाईक यांनी सांगितले.
अंगणवाडी सेविका व मदतनिस यांचे थकलेले मानधन तातडीने मिळण्याबाबत तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवानिवृत्त पेन्शन मिळावे. अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या रिक्त जागेवर तातडीने नियुक्ती करण्यात बाबत अंगणवाडी सेविका मदतनिस व युनियन लिडर यांनी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांच्याकडे केली होती रूचिता नाईक यांनी तातडीने पत्रव्यवहार करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेऊन पत्र दिले येत्या आठवड्या भरात मानधन समस्या मार्गी लावु असे आश्वासन दिले.
No comments:
Post a Comment