Tuesday, 23 May 2023

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते स्फूर्ती फाउंडेशनच्या कार्याचा सन्मान !!

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या हस्ते स्फूर्ती फाउंडेशनच्या कार्याचा सन्मान !!
 
*कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १०० शिलाई मशीन प्रशिक्षण व मशिन वाटप कार्याची दखल*

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय महिला बाल विकास विभाग येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आयोग आपल्या दारी या संकल्पनेतून प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन महिलांच्या समस्या व तक्रारी यांचे निराकरण करण्यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने महिला बाल विकास विभाग यांच्या माध्यमातून कोविडमध्ये निधन झालेल्या व इतर कारणास्तव निधन झालेल्या विधवा महिलांना शिलाई मशीन प्रशिक्षण व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले होते त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली ताई चाकणकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात १०० महिलांचे शिलाई मशीन प्रशिक्षण व मशिन वाटप या कार्याची दखल घेत स्फूर्ती फाउंडेशन चा सन्मान सदस्या शिल्पा तांगडकर व अध्यक्ष बजरंग तांगडकर यांना‌ प्रशस्ती पत्र देऊन  केला.

यावेळी प्रमुख प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर, जिल्हा अधिकारी -अशोक शिनगारे, जिल्हा महिला बालविकास विभाग अधिकारी महेंद्र गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते.

स्फूर्ती फाउंडेशन च्या मिरा तांगडकर, गांगुर्डे, तारा संजय पाटील, रायबान, यांना शिलाई मशीन प्रशिक्षण पत्र देण्यात आले तसेच स्फूर्ती फाउंडेशन चे अध्यक्ष बजरंग तांगडकर, सदस्या शिल्पा तांगडकर, गणेश कंडु, लक्ष्मण शिंपी कार्यक्रमाला उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या *महिला आयोग आपल्या दारी* या बैठकीत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध महिला पेन्शन योजना बाबत संबंधित विभाकडून योग्य माहिती दिली जात नाही व कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागतात याबाबत स्फूर्ती फाउंडेशन ने महिला आयोग अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर यांच्या कडे तक्रार केली त्यांनी संबंधित विभागाला कार्यवाही चे आदेश दिले आहेत असे शेवटी बजरंग तांगडकर म्हणाले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...