Monday, 8 May 2023

१२ मे रोजी शहरात शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबिराचे आयोजन !

१२ मे रोजी शहरात शिवसेनेचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिबिराचे आयोजन !

*विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची माहिती*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. ८ :  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींचे शहरातील तापडिया नाट्यमंदिर येथे एकदिवशीय शिबिर आयोजित करण्यात आले आहे.शिबिरास सकाळी १० वाजेपासून सुरुवात होणार असून शिवसेना नेते मा.खा. चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर व आमदार उदयसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती विरोधी पक्षनेते व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिली आहे.


या शिबिरास महिला आघाडी व युवा सेनेसह उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख,
विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवसेना पक्षाचे लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित असणार आहेत. याव्यतिरिक्त नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरातील शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनी या एकदिवसीय शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, किशनचंद तनवाणी, राजेंद्र राठोड, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी, युवा सेना जिल्हायुवाअधिकारी हनुमान शिंदे, शुभम पिवळ, कैलास जाधव मच्छिंद्र देवकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...