Monday 8 May 2023

भाजपच्या सत्तेची भाकरी पलटवण्याची गरज.. कॉम्रेड अमृत महाजन

भाजपच्या सत्तेची भाकरी पलटवण्याची गरज.. कॉम्रेड अमृत महाजन 

*धनवाडी येथे भाजपा भगाव देश बचाव प्रबोधन बैठक* 

                 कॉम्रेड अमृत महाजन ( राज्य उपाध्यक्ष )

चोपडा, प्रतिनिधी.. तालुक्यातील धनवाडी येथे भाकपाचे नेते माजी उपसरपंच कॉम्रेड शांताराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हितचिंतक कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली त्यावेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल भाकप नेते कॉ अमृत महाजन यांनी मार्गदर्शन केले. 

त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की *दिल्लीचया भाजप आरएसएस चे केंद्रीय सत्तेची भाकरी पलटवण्याची पाळी आलेली आहे. कारण 2014 च्या निवडणुकीमध्ये भाजपाने जनतेला  अच्छे दिन आने वाले है; काळा पैसा भारतात आणून प्रत्येकाच्या अकाउंटवर 15 लाख रुपये सहज पडतील .. बहुत हो गयी महंगाई की मार,अब लाव मोदी सरकार  अशा वल्गना करून  सत्तेवर आलेले मोदी सरकार गेल्या नऊ वर्षात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव देऊ शकले नाही. उलट बी बियाणे औषधे यांच्या किमती वाढवत असतात  शेतमालाच्या किमती मात्र उतरवून शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे. महागाई ने कळस गाठला आहे. कोरोना काळात कामगारांच्या हालांना पारावर नव्हता . कामगारांना कामाची शाश्वती नाही, जागतिक बाजारपेठेत पेट्रोल डिझेलचे भाव उतरले पण त्याचा फायदा जनतेला नाहीये. बेरोजगारी वाढलेली आहे, जनतेला या मूलभूत प्रश्नापासून सुटका हवी आहे पण मोदी सरकार जनतेला धर्माची अफू  देत आहे. दुसरीकडे बलात्कारी आमदार सेंगर, आसाराम, राम रहीम  पासून गुजरात दंग्यातील आरोपींना सोडत आहे, खासदार ब्रिजभूषण शर्मा यांची पाठराखण करत असतात. त्यांचे विरुद्ध कुस्तीगीर महिला पंधरा दिवसापासून आंदोलन करीत आहेत परंतु मोदी सरकार त्यावर बोलत नाही. तरीही संविधानाच्या ताकदीमुळे भारतीय जनता अजून बलवान आहे आणि म्हणून केंद्र सरकारच्या सत्तेची भाकरी पलटवण्याची पाळी आलेली आहे "दहा वर्षात तुमचे भरपूर कौतुक झाले आता सत्तेवरून चालते व्हा" हे सांगण्याची गरज आहे तेव्हा भाजप हटाव देश बचाव, भाजप हटाव महाराष्ट्र बचाव, असे आवाहन काँ अमृत महाजन यांनी आपल्या भाषणात केले 14 एप्रिल 2023 ते 15 मे 2020 काळात भारतभर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ही मोहीम सुरू केली आहे, त्यानिमित्ताने धनवाडी गावी ही सभा झाली त्यावेळी माजी सरपंच भगवान पाटील माजी सरपंच ताराबाई भील, लहू पाटील, नंदकिशोर पाटील, रमेश चौधरी, नवल चौधरी, भावलाल पाटील, अंजनाबाई भिल, विमलबाई भिल, सुखमाबाई भिल कार्यकर्ते व हितचिंतक एकदा उपस्थित होते

No comments:

Post a Comment

डोंबिवली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. रतन टाटा आणि कै. कैकई घारडा (घारडा केमिकल्स) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!

डोंबिवली येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  आणि दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने श्री. रतन टाटा आणि कै. कैकई घारडा (घारड...