Sunday, 7 May 2023

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन योजनेचे भूमिपूजन !!

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन योजनेचे भूमिपूजन !!

अंबरनाथ, प्रतिनिधी, दि ७ :भारतातील प्रत्येक गावांमध्ये नळाद्वारे पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचा संकल्प देशाचे लोकप्रिय पंतप्रधान सन्माननीय श्री. नरेंद्र मोदी साहेब यांनी केला होता. याच मिशनच्या माध्यमातून हर घर नल हर घर जल या योजनेचा शुभारंभ त्यांनी केला होता.

मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, चिंचवली, मांगरूळ, काकडवाल, गोठणीपाडा, खरड, ढोके, कुशिवली व आंभे या गावांच्या १५८३.१७ लक्ष निधी मधून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करण्यात आला तसेच श्री.मलंग गडाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि मजबुतीकरण करण्यात येणार आहे या रस्त्याचे कॉक्रीटीकरण १२ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार असून या कामाचा देखील भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला.

डॉ. शिंदे म्हणाले जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गाव – पाड्यांकरीता जिल्हा परिषद ठाणे मार्फत सन २०१९-२०२४ या वर्षाचा एकूण रु.७२६.१३ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असुन या कामांचे कार्यादेश कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील संरपच यांना देण्यात आलेआहेत . जल जीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील ७८७ गावांकरीता योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये ४९० रेट्रोफिटींग व २९७ नवीन योजनांचा समावेश करण्यात आला आहे. सद्यस्थितीत दीड लाख कुटूंबाना घरगुती नळजोडणी देण्यात आली असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

यावेळी या भूमिपूजन सोहळ्यास कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महेश पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, प्रशासक आणि ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...