Sunday 7 May 2023

मा. आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा मतदारसंघात विकास कामांचे भूमिपुजन !


मा. आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा मतदारसंघात विकास कामांचे भूमिपुजन !
 

कल्याण, प्रतिनिधी : राज्य शासनाच्या विशेष विकास निधी तसेच आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या आमदार निधी मधून कल्याण पूर्वेतील अनेक ठिकाणी विविध कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला. यात .. 

* अनमोल गार्डन कमान ते अनमोल गार्डन गेट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे - २५ लक्ष निधी
* अनमोल गार्डन ऑफिस ते गणेश ढोणे यांच्या कार्यालयापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे - २५ लक्ष निधी
* चिंचपाडा पार्वती कन्स्ट्रक्शन ऑफिस ते पार्वती आंगण कॉम्पलेक्स पर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे - २५ लक्ष निधी

यावेळी या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सोबत मा.नगरसेवक श्री. अभिमन्यू गायकवाड, माजी उपमहापौर श्री. मोरेश्वर भोईर, मा.सरपंच श्री. प्रल्हाद ढोणे, मा.सरपंच श्री. गणेश ढोणे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष श्री. गुड्डू खान, श्री. नितेश म्हात्रे, श्री. संतोष शेलार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

तसेच आणखी अधिक विकास कामांचे भूमिपूजन आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या हस्ते झाले  ...

* चिंचपाडा रिक्षा स्टॅन्ड ते हनुमान मंदिर पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे - २५ लक्ष निधी
* चिंचपाडा येथील बालाजी चौक ते विठ्ठल बाबू अपार्टमेंट पर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे- २५ लक्ष निधी
* चिंचपाडा येथील वैष्णवी प्लाझा ते गजानन बारकू म्हात्रे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे- २५ लक्ष निधी
या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी सोबत मंडळ ओबीसी मोर्चा सरचिटणीस श्री.अनिल म्हात्रे, सरचिटणीस श्री. नितेश म्हात्रे, श्री. संतोष शेलार, श्री.सौरभ सिंग,  श्री.चंद्रशेखर म्हात्रे, श्री.चेतन म्हात्रे, सौ.रेखा इंगळे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

आज कल्याण पुर्वेचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले की माझा मतदारसंघातील मुलभूत गरजा रस्ते, पाणी, वीज या पुर्ण करण्यासाठी जे आवश्यक ते प्रयत्न करीत असतो‌. यावेळी बोलतांना नागरिकांनी सांगितले की आमचे आमदार हे आम्हाला नेहमीच उपलब्ध असतात तसेच आम्ही आमच्या विभागातील समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते नक्की सोडवितात म्हणून आमदार गणपतशेठ गायकवाड यांची त्यांच्या मतदारसंघात "आपला माणूस आपला आमदार" अशी ओळख आहे.

No comments:

Post a Comment