Monday, 22 May 2023

अखेर अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती लाभ रकमा वाटप सुरू!!

अखेर अंगणवाडी सेविकांना सेवानिवृत्ती लाभ रकमा वाटप सुरू!!

*आयटक च्या पाठपुराव्यास यश* 

चोपडा, प्रतिनिधी ..  महाराष्ट्र राज्यात 65 वर्षे वयाचा नंतर सेवानिवृत्त झालेल्या किंवा मध्येच राजीनामा देऊन नोकरी सोडलेल्या व मयत झालेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस  कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने 2014 पासून सेवानिवृत्ती लाभ सेविकांसाठी एक लाख रुपये व मदतनीस यांना 75 हजार रुपये देण्याचे परिपत्रक काढले आहे  पण 2017/18 पासून सेवा निवृत्तना लाभ दिलेले नव्हते, या संदर्भात 'अंगणवाडी, बालवाडी, कर्मचारी, युनियन आयटक' तर्फे सतत पाठपुरावा चालू होता महिला बाल विकास मंत्री आयुक्त भवन लोकायुक्त न्यायालयात अर्ज फाटे, जळगाव जिल्हा युनियन तर्फे आंदोलने केली सरते शेवटी महाराष्ट्र सरकारने सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविका- मदतनीस यांना एलआयसी एकरकमी लाभाची सेवानिवृत्ती बाबतचे प्रस्ताव यादी मंजूर करुन १२४६ लाभार्थ्यांची एक रकमी लाभाची रक्क्म त्याचे खाती जमा करण्यात आलेली आहे. तसेच ५५१ प्रस्तावांना त्रुटी अभावी लाभ देण्यात आला नाही. संबंधित त्रुटींची कारणे तपासून त्याची पूर्तता करण्यात येऊन. जेणेकरून संबंधित लाभार्थ्यांची रक्कम त्यांचा बँक खात्यात जमा करण्यात येईल.असे आश्वासन महिला बालकल्याण एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प राज्य कार्यालयाने दिले आहे. त्या संदर्भात राज्य युनियनचे पदाधिकारी सर्वश्री श्याम काळे दिलीप उटाणे, एडवोकेट माधुरी क्षीरसागर तारा बनसोड, नयन गायकवाड यांनी नुकतेच राज्य कार्यालयात चर्चा केली असता वरील प्रमाणे माहिती दिली आहे व यादीही सोबत दिली आहे. असे जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष काँग्रेस अमृत महाजन यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात  आहे

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...