Monday, 22 May 2023

नालासोपारामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

नालासोपारामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेत महिलांचे जोरदार इनकमिंग..!

वसई, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने प्रेरित होऊन व आ.जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक साहेब व जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडी शहर संघटक सौ. रूचिता अमित नाईक यांच्या हस्ते महिलांचा पक्ष प्रवेश सोहळा नियुक्ती पत्र देऊन पार पाडण्यात आला.

यावेळी महिला आघाडी उपशहर संघटक पदी सौ.आशाताई सातपुते, निळेगाव विभागप्रमुख सुजाता जाधव, युवा शाखा अधिकारी सलोनी गोलांबडे यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना महिला आघाडी संघटन मजबूत झाल्यास तळागाळातील महिलांचे प्रश्न सोडवता येईल एक महिला कुटूंब सांभाळुन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी झेप घेऊ शकते म्हणुन महिलांनी स्वतःचा आत्मविश्वास वाढवून राजकारणात यावे व निवडणुकीत सहभागी होऊन येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर साहेब व उपतालुका प्रमुख अजित दादा खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपारात महिला आघाडी भगवा फडकवु असा विश्वास 
महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक यांनी व्यक्त केला.
यावेळी शहरप्रमुख समीर गोलांबडे, विभागप्रमुख गणेश मुनगेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...