मोदी सरकारचा २००० च्या नोटा रद्द चा तुघलकी निर्णय !!
लेखक.. कॉम्रेड अमृत महाजन (चोपडा)
भारताचा इतिहासात मोहम्मद बिन तुगलक नावाचा मोगल राजा सन १३२५ ते १३५१ या काळात दिल्लीवर राज्य करत होता. त्या काळी जी चांदीची नाणी बनवले जात असे. चांदीच्या टंचाई वर मात करण्यासाठी त्यांने तांब्यापितळेची नाणी बनवायला परवानगी दिली होती. त्यावर अरबी भाषेत मजकुर असायचा. त्याच्याबद्दल अशीही वदंता आहे की, त्याने चामड्याची नाणी बनविण्यासाठीही परवानगी दिली होती. त्याच्या निर्णयामुळे काही लोक घरच्या घरी सुध्धा नाणी बनवत असत. तो सांकेतिक नाण्याच्या सुद्धा वापर करत होते. सांकेतिक म्हणजे आजचा डिजिटल व्यवहार सारखा व्यवहार असावा. हा शासक थट्टा (सिंध पाकिस्तान) मधे झालेले बंड मोडायला गेला असता आजारी पडला आणि 20 मार्च 1351 रोजी त्याचा मृत्यु झाला.
त्याचा मृत्यु वर तत्कालीन विद्वान अब्दुल कादिर बदायुनी म्हणाला की “सुल्तान को प्रजा से और प्रजा को सुल्तान से मुक्ति मिल गयी"
आजच्या नोटबंदीच्या निर्णय तुघलकी व्यवहार सारखाच आहे तो खालील बाबिंवरून लक्षात येते....
भारतात नऊ वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीचा पहिला निर्णय घेतला. त्यावेळी एक हजार रुपयाची नोट चलनात होती. काळा पैसा चलनात भरपूर असून १०००/ ५०० ची नोट रद्द केली. तर काळा पैसा संपुष्टात येईल अशा दावा केला गेला, गावोगावी भाजप, आरएसएस, सत्ताधारी पक्षाचे हितचिंतक यांच्यांत या निर्णयाने देशभक्तीची लाटच संचारून गेली होती. १००/५०० चे नोटा रद्द केल्या. त्यावेळी एक हजाराच्या नोटा मोजक्या लोकांकडे होत्या आणि पाचशेच्या नोटा मात्र कोट्यावधी शेतकरी, शेतमजूर, असंघटित, संघटित कामगार यांचेकडे तसेच. मध्यमवर्गीय, घरकाम करणाऱ्या महिला पासून म्हातारपणात औषधासाठी व अडचणीसाठी म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी सांभाळून ठेवल्या होत्या.. नोटा बदलल्याच्या किचकट नियमामुळे व बदलासाठी कमी वेळ त्यामुळे अशा लोकांचे बरेच नुकसान झाले, शिवाय नोटा बदलाचा काळ थंडीचा असल्यामुळे बँकासमोर रात्री बे रात्री रांगा लागल्याने त्यात अनेक लोक मरण पावले. अशा सर्वसामान्य जनतेच्या हालावर व मृत्यूंवर संवेंदन शून्य मोदी सरकार ने दिलगिरी तर सोडाच पण खेद ही व्यक्त केला नाही. ही झाली पहिल्या नोटबंदीची कथा आणि व्यथा.!
आता नवी २००० ची गुलाबी नोटबंदी निर्णयाचे बघू...
या मोदी सरकारने काढलेल्या नवीन ५०० ची नोट छापायचा खर्च २.५७ तर २००० साठी ४.१८ येतो.. आता २०००ची नोट रद्द केल्यामुळे ATM मशीन मध्ये आवश्यक ते बदल करावे लागतील. सॉफ्टवेअर बदलावे लागतील नोटा मोजण्याचे मशीन यात बदल करावे लागतील. दोन हजाराच्या नोटा मोजताना जो वेळ लागायचा तो आता चार पट लागेल. या नोटा बदलवण्यासाठी पूर्वीसारखा तपशील लेखी स्लिप भरावी लागत नाही. त्यामुळे नोट बदलली की, आम्ही अमुक अमुक बँकेतून ५०० रु. नोटा घेतल्या पुरावा बँकेचाच..!. नोटा मोजनारी मशीन असली नकली नोट शोधणारी मशीन.. ही सर्व मशिनरी मोडीफाय करावी लागेल.आता नोटबदलासाठी १०० दिवस बँक दिवस मिळतात.. १० नोटा बदलून आण आणि ५०० रु घे.असेही घडू शकते.. अशा त्तहेने नोटा बदलतील. काळा पैसा जमा होईल वगैरे झुट आहे . भारतातील काळा पैसा निवडणुका व मोठमोठे उद्योग केंद्र पटकवण्यासाठी वापरला जातो. निवडणुकीत नेत्यांच्या सभा मिरवणुका या तर पैसा वाटल्याशिवाय यशस्वीच होत नाही डाव्या पक्षांच्या अपवाद वगळला तर भांडवलदारी पक्ष निवडणुकीत भरमसाठ पैसा वापरतात त्यात काळा पैसा वापरला जातो. निवडणुकीत ५०० ₹ नोटा वाटायला सुलभ जातात.. आणि त्यावेळी २०००₹ नोटा छापल्या आता त्या ही रद्द करून ५००/५०० रुपये च्याच ठेवल्या जाणार आहेत पण त्याच वेळी ५०० चीच नोटा ठेवल्या असत्या तर..मशिनरी सॉफ्टवेअर चेंज करण्याची गरज भासली नसती..! *मोदी सरकारच्या दोन हजार रुपयांच्या नोटबंदी मागे उघड गुपित असे आहे की, त्यावेळी १०००₹ चे नोटा जमा करून २०००₹ चे नोटा देऊन सुरक्षित करायचे होते. आता ती रद्द करून त्या पैशांची सुरक्षा पडताळणी करून आश्र्वस्त करायचे आहे*.. याचा अर्थ असाही नव्हे की, दोन हजार रुपयांच्या नोटा ज्याचे जवळ आहेत तो पैसा शंकास्पद आहे. नोकरदार मध्यवर्गीय प्रमाणे प्रामाणिक उच्चवर्गीय अधिकारी काही उद्योजक यांच्याकडेही तो काही प्रमाणात आहे. पण गेल्या ७ वर्ष काळात तर २०००₹ ची नोट दिसतही नव्हती व तिच्या बिगर कुणाचे अडत ही नव्हते. मग या बंदी निर्णयावर टीका का तर.. .ज्या ज्या ५००/५००₹ चे नोटा शेतकरी मजूर यांचे जवळ सहज मिळत त्यांची संख्या जास्त असताना त्या नोटा बदलून देणेसठी मोदी सरकारने फक्त ४० दिवस दिले त्यात बँक कामाचे ३१ दिवस ..रोज २०००₹ च मिळतील . हा नियम केला म्हणजे कोट्यवधी लोकांना कमी मुदत आणि कमी मर्यादा आणि त्यातही जमा पैशांची स्लीप आणि तपशील द्यावा लागे..आणि स्वतःचे पैसे काढणेसाठी मोठमोठ्या रांगेत उभे राहावे लागे. आणि..२०००चे नोटा बदलवताना.. काहीच नियम नाहीत. *एकूण मोदी सरकारचा हा निर्णय मोहम्मद बिन तुगलक शासक सारखाच आहे.. 500₹ चे नोटा बदलवणाऱ्याना हाल व 2000च्या नोटा बदलवणाऱ्या ला गालिचा अंथरणारे मोदी सरकार*!*! मोदी सरकार सामान्य जनतेचे सरकार नसून आर्थिक दृष्टया प्रबळ लोकांचेच सरकार आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे.
No comments:
Post a Comment