लोकप्रतिनिधी मतांसाठी गोर गरीबांचे उंबरे झिजवतात आणि संकटकाळी त्यांना वाऱ्यावर सोडतात – निलेश सांबरे
भिवंडी, प्रतिनिधी : भिवंडी तालुक्यात मागील आठड्यात झालेल्या वादळी वा-यासह झालेल्या पावसामुळे भिवंडीतील पडघा, बोरीवली, सांगपाडा, वाफाले आदी परिसरात अनेक घरांवरील पत्रे उडून गेले होते. यात अनेक गरीब कुटुंबांचे मोठ्या प्रमाणांवर नुकसान झाले. घरांमध्ये साठवून ठेवले अन्न धान्य मोठ्या प्रमाणात भिजल्याने या पावसामुळे अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आल्याने येथील नुकसानग्रस्त कुटुंबांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. तर एका लग्नघरात देखील घरावरील पत्रे उडून घरातील अनेक सामान अन्यधान्य यांची देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.
नुकसान झालेल्या कुटुंबियांबाबत जिजाऊ समाजिक व शैक्षणिक संस्थेला माहिती मिळताच संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्तीश: जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली व संस्थेच्या वतीने येथील नुकसानग्रस्त असलेल्या ५ गावांतील ग्रामस्थांना घरावरील एकूण ३५० पत्रे वाटप करण्यात आले. तर याच गावात राहणारे सरावन्या रामा पवार सागपाडा, वाफाले हे वृध्द गृहस्थ राहतात. त्यांना तीन मुली असून त्या तिघींचीही लग्न झाली आहेत. त्यामुळे हे वृद्ध गृहस्थ घरी एकटेच राहतात परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. जिजाऊ संस्थेने या वृद्ध गृहस्थांना संपूर्ण बांधून देण्याची जबाबदारी घेतेली असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदतही करण्यात आली आहे. तर एका गावातील लग्नघरात देखील या वादळीपावसाचा तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले होते . या कुटुंबाला देखील जिजाऊ संस्थेने मदत केली आहे.
भिवंडी तालुक्यात झालेल्या या नुकसानीची पडझडीची माहिती असूनही एकही लोकप्रतिनिधीने याची दाखल घेतली नाही अथवा मदत केली नाही. केवळ मतांचा जोगवा मागणासाठी गोर गरीबांचे उंबरे झिजवायचे आणि अश्या संकटकाळी त्यांना वाऱ्यावर सोडायचे आणि आपण परदेश वाऱ्या करायच्या जनतेच्या हतबलतेचा केवळ निवडणुकांपुरती बाजार मांडायचा, हे कितपत योग्य आहे अश्या संतप्त भावना यावेळी निलेश सांबरे यांनी व्यक्त केल्या तर आता आमचा समाज सज्ञान झाला आहे. आम्हांला गृहीत धरणे आता सोडून द्या आमाचा पैसा जर आमच्या हितासाठी वापरणार नसाल तर तुम्हाला निवडणूक लढवण्याचा काहीही अधिकार नाही . आता जनता तुम्हांला तुमची जागा दाखवेल असे देखील सांबरे म्हणाले.
जन सामान्याचे आधारवड आदरणीय निलेश साबरे साहेब
ReplyDeleteसाहेब तुमच्या कामाला त्रिवार अभिवादन💐💐💐💐
ReplyDeleteJay jijau
ReplyDeleteJay jijau
ReplyDeleteJai jijau
ReplyDeleteलोक नेता असावा तर ,,,, सांबरे ,,,,साहेबांसारखा.
ReplyDeleteजय जिजाऊ
ReplyDeleteJay jijau
ReplyDeleteJay jijau
ReplyDeleteJai Jijau🌻
ReplyDeleteसंकट मोचन ,,,,,,,, लोकनेते,,,, आदरणीय, सांबरे साहेब.
ReplyDelete