लाचखोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात पण शिक्षा झाल्याचे प्रमाण अत्यल्प !!
मुंबई, प्रतिनिधी : आकर्षक पगार असतानाही वरकमाईसाठी विविध मार्गांचा उपयोग करून सरकारी कर्मचारी सरळसरळ लाच मागतात. अशांवर कारवाई देखील केली जाते. गेल्या साडेचार वर्षांत राज्यात 3 हजार 407 लाचखोरीचे यशस्वी सापळे झाले आहेत.
त्यामध्ये 4 हजार 649 आरोपींवर गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र, यातील फक्त 125 प्रकरणे शिक्षेपर्यंत पोहचली. त्यातील 157 जणांना शिक्षा झाली आहे.
आतापर्यंत झालेल्या शिक्षांमध्ये 25 क्लास-वन अधिकाऱ्यांना शिक्षा झाली, तर द्वितीय व तृतीय श्रेणीसह 132 कर्मचाऱ्यांना दोषी मानत न्यायालयांनी शिक्षा सुनावल्या. दिवसेंदिवस लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. ऍन्टी करप्शन विभागाकडून लावले जाणारे सापळेही यशस्वी होतात. पण त्याचे रुपांतर शिक्षेत होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उपलब्ध केलेल्या माहितीच्या आधारे स्पष्ट झाले आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून विविध विभागांतील वर्ग-एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत लाचेची मागणी केल्याचे प्रकार घडत असतात. यात महसूल विभाग नेहमीप्रमाणे लाचखोरीत सर्वांत वर आहे. तर त्याखालोखाल पोलीस खात्याचा नंर लागतो. प्रकरणांमध्ये होणारा तपासात होणारा विलंब हा आरोपींच्या पथ्यावर पडत आहे.
No comments:
Post a Comment