घाटकोपर मध्ये मनसे तर्फे ४३६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वह्या वाटप !
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत प्रभाग क्रमांक-१२९ शाखाध्यक्ष अरविंद गीते यांच्या वतीने विभागातील विद्यार्थ्यांची वह्या वाटप नोंदणी करण्यात आली होती. यावेळी प्रभागातील ४३६० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यावेळी नोंद केली. वह्या वितरण कार्यक्रमात मनसेचे सरचिटणीस शिरीष सावंत यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या.मनसे विभाग अध्यक्ष गणेश चुक्कल, उपविभाग अध्यक्ष निलेश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी महिला शाखाध्यक्ष राधिका तांबे , विजया गीते यांच्यासह कार्यक्रमात विद्यार्थीसह पालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.
No comments:
Post a Comment