Saturday, 3 June 2023

*अनुसूचित जमातीच्या युवकांनी - ऑटोमोबाईल प्रशिक्षणासाठी अर्ज करावे*

*अनुसूचित जमातीच्या युवकांनी - ऑटोमोबाईल प्रशिक्षणासाठी अर्ज करावे*

जव्हार, जितेंद्र मोरघा :

अनुसूचित जमातीच्या द्रारिदय रेषेखालील आदिवासी युवकांना ऑटोमोबाईल प्रशिक्षण प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जव्हार यांच्या मार्फत देण्यात येणार आहे.

जव्हार कार्यालयाच्या अंतर्गत जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा या चार तालुक्यातील दारीद्य रेषेखालील अनुसुचित जमातीच्या लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह वरील कार्यालयात दि.5 जून ते दि. 19 जून या कालावधीत विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. यापूर्वी सादर करण्यात आलेले अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. लाभार्थ्यांनी नवीनच अर्ज सादर करावे.

*अटी व शर्ती तसेच कागदपत्रांबाबत तपशिल*

     लाभार्थी हा अनुसुचित जमातीचाच असावा त्याच्याकडे स्वत:चा जातीचा दाखला असावा, लाभार्थ्याने दारीद्य रेषेचा दाखला असणे आवश्यक आहे, अपंग लाभार्थ्याना ३ टक्के आरक्षणानुसार प्राधान्य देण्यात येईल, लाभार्थी इ. ८ वी पास असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याने सदर योजनेचा लाभ यापूर्वी या कार्यालयाकडुन घेतलेला नसावा, लाभार्थ्याचा रहीवाशी दाखला असावा, अर्जदाराच्या नावे ग्रामसेवक यांचा ना हरकत दाखला असणे आवश्यक आहे, लाभार्थ्याचे आधारकार्ड व रेशनकार्ड च्या छायांकीत प्रती अर्जासोबत सादर कराव्या, अर्जासोबत अलीकडे काढलेले २ पासपोर्ट आकाराचे फोटो जोडण्यात यावे, अंतिम लाभार्थी निवडीबाबतचे व योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी सर्व अधिकार राखून ठेवण्यात आले आहेत, विहीत नमुन्याचे लाभार्थी अर्ज कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत, लाभार्थी शासन नियमानुसार प्रशिक्षण पुर्ण करण्यास इच्छुक असावा. असे आवाहन जव्हार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुषी सिंह यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर !

श्रीअप्पासाहेब निकत (IFS Officer ) यांना वन सेवेतील वन संरक्षणाच्या प्रभावी व सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने राज्यस्तरीय सुवर्ण...