Saturday 3 June 2023

कोकणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व रवींद्र मटकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !!

कोकणातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व रवींद्र मटकर यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !!

[ ठाणे : उदय दणदणे ]

कोंकणातील कला ,सामजिक क्षेत्रातील उत्तुंग अशी व्यक्तिमत्त्व रत्नागिरी जिल्हा, राजापूर तालुक्यातील चुणाकोळवण गावचे सुपुत्र समाजनेते रवींद्र मटकर यांचा ५० वा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार, दिनांक-०१ जून २०२३ रोजी मुंबई उपनगर, ठाकुर्ली येथे श्रीनिवास सोसायटी, त्यांच्या निवासस्थानी  मोठ्या उत्साहात साजरा झाला.

रवींद्र मटकर गेली अनेक वर्षे सामाजिक, सहकार क्षेत्रात कार्यरत असून त्याचबरोबर कोकणातील लोककला व लोककलावंतांच्या न्याय हक्कांसाठी सदैव प्रयत्नशील राहून प्रशासनाकडे  विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. कोकणातील लोककलेवर त्यांचे नितांत प्रेम असून. मुंबई सह अन्य ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहित करत असतात. गेल्या दोन वर्षांपूर्वी नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र -भारत) या संस्थेची निर्मिती होऊन सदर संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा ते सक्षमपणे सांभाळत आहेत. नमन लोककला संस्थेच्या माध्यमातून आजवर त्यांनी विविध उपक्रम हाती घेण्या बरोबरच लोकलावंतांच्या विविध मागण्यांसाठी रवींद्र मटकर यांनी कोकणातील  सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या भेटी गाठी घेऊन कलाकारांच्या मागण्यांकडे लक्ष वेधले आहे. 

जनमानसात आपुलकीचे बंधुत्वाचं नातं जपत, समाजात बांधिलकी जपत आपल्या प्रेरणादायी विचाराने अनेकांना आपलंसं करणारे समाजनेते रवींद्र मटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक समाजबांधव आज विविध संस्थेत     समाजसेवेत कार्यरत आहेत. समाज परिवर्तित होण्यासाठी ही बाब त्यांच्यासाठी निश्चितचं मोठं यश म्हणावे लागेल, ५० व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी समाज बांधव, भगिनींची जमलेली ऐतिहासिक गर्दी हीच त्यांच्या कार्यसेवेची पोच पावती खरी संपत्ती होय. 

सदर वाढदिवस सोहळ्यानिमित्त ख्यातनाम महिला शाहीर गायिका- संगीता पांचाळ- बलेकर, शाहीर तुषार पंदेरे यांनी वाढदिवस प्रत्यर्थ गीत गायन करून वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा अधिक रंगतदार केला. तर जागतिक दर्जाचा उत्कृष्ट कलाकार जवळ जवळ १३० विविध आवाजात मिमिक्री करणारे महेश कुमार यांनी आपली छोटे खाणी कला सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तर साहित्यिक /पत्रकार व्यख्याते -शाहिद खेरटकर यांनी 'सामजिक बांधीलकी एक जबादारी" या विषयी उपस्थितांना प्रबोधात्मक मार्गदर्शन केले.

समाजनेते रवींद्र मटकर यांच्या प्रति आदर,निस्सीम प्रेम करणारे असंख्य समाज बांधव यांनी ५० व्या वाढदिवसानिमित्त उपस्थिती लावली होती. अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ चे अध्यक्ष-रविकांत बावकर, कार्याध्यक्ष-संतोष चौगुले, सेक्रेटरी-विलास पळसमकर, खजिनदार-संकेत ठीक /सुभाष बांबरकर, राजापूर अध्यक्ष-विश्वास राघव, पतसंस्था अध्यक्ष- झिमांजी मांडवकर, घाटकोपर शाखा अध्यक्ष- सुरेश जाधव, समाजनेते -सुभाष बाणे, युवक मंडळ अध्यक्ष-बापू ओकटे आणि सहकारी रमेश पाडावे, राजेंद्र कावणकर, समीर बलेकर, शाखा घाटकोपर सचिव- समिर पाष्टे, सहसचिव- सत्यावन पालेकर, सांस्कृतिक विभाग सेक्रेटरी- संतोष कुलये/ रमाकांत जावळे, महिला अध्यक्ष/ कुणबी बँक संचालिका- कल्पना ताई पाटणकर, नमन लोककला संस्था कार्यक्षेत्र -भारत संस्थेचे महासचिव- शाहिद खेरटकर, सचिव- सुधाकर मास्कर /तुषार पंदेरे, सदस्य -संदिप कानसे, प्रशांत भेकरे, अमित काताळे, पिंकेश बापर्डेकर, पत्रकार -दिपक कारकर (चिपळूण) पत्रकार- उदय दणदणे (गुहागर) कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ अध्यक्ष-अनंत तांबे, सह सेक्रेटरी-काजरेकर, अनंत फिलसे, प्रमोद खेराड, दशरथ डांगरे, शशिकांत बाणसे, संजय गोधळी, संतोष टक्के - मामा, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा- राजापूर चे पदाधिकारी-अध्यक्ष- सुभाष तांबे सहकारी सुजय गीते, प्रकाश भगते, तानाजी तळेकर, अमोल पळसकर, वैभव भगते, स्वप्नील मिरजोळकर, बलराम तांबे, दशरथ तांबे, अमर गोरूले, कल्पेश म्हादये, ॲड.सतिश घएवडए, ॲड.नेहा बाणे, लाँफर्म जे सागर असोसिएट- मानशी पाटील, महेश घाग, दिलीप मिठबावकर, श्रीनिवास सोसायटी चे पदाधिकारी, ग्रामविकास समिती चुनाकोळवण मुंबई/ग्रामीण पदाधिकारी-सुनील मटकर, सुरेश सावंत, मोहन भे़रे,  प्रदीप भेरे, महेंद्र भेरे, मुकूंद मटकर, शिवसेना लांजा तालुका संपर्क प्रमुख- जगदीश दादा जुलूम अशी विविध क्षेत्रातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-दिपक कारकर, शहीद खेरटकर यांनी केले. माझ्या  ५० व्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपण शुभेच्छारुपी भेट देऊन माझ्या आयुष्यातील या महोत्सवी सुवर्ण दिनी आनंद अधिक द्विगुणीत केल्याबद्दल तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण दिलेल्या शुभेच्छांचा अगदी मनापासून आभारी आहे.आजवर जे प्रेम दिलात ते भविष्यातही कायम राहील अशी आशा व्यक्त करत समाजनेते रवींद्र मटकर यांनी सर्वांचे शतशः ऋणी असल्याचे सांगितले आहे.

1 comment:

  1. वाह! खुपच संकल्पना होती आणि व्यवस्थित रित्या पार ही पाडली....धन्यवाद!
    पुन्हा एकदा मटकरसाहेबांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन!

    ReplyDelete

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघा...