स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून सेल्फी विथ लाभार्थी महिला उपक्रम संपन्न !
*महिला सक्षमीकरणासाठी 'गोडवा" गृहउद्योगाचा शुभारंभ*
स्फूर्ती फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माध्यमातून विविध शासकीय योजना मागील काही महिन्यांपासून सुरू आहे या माध्यमातून सेल्फी विथ लाभार्थी महिला उपक्रम राबविण्यात आला यामध्ये शिलाई मशीन प्रशिक्षण व शिलाई मशीन वाटप करण्यात आलेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले.
त्याचबरोबर सुकन्या समृद्धी योजना लाभार्थी महिलांना पोस्ट पासबुक देण्यात आले, महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड, ई श्रम यांचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर विधवा महिलांच्या मुलांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले स्फूर्ती फाउंडेशनने तरूण तरूणींना रोजगार देण्यासाठी फ्लिपकार्ट व मयंत्रा कंपनीच्या माध्यमातून वाॅक इन मुलाखती आयोजित केल्या होती यामध्ये अनेक तरूण व तरूणींनी सहभाग नोंदविला, यावेळी स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून व मात्र श्री हाॅस्पिटल डाॅ ज्योती साबळे महिला रोग तज्ञ महिलांसाठी मोफत हिमोग्लोबिन तपासणीचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी नवीन गृह उद्योग 'गोडवा' या उत्पादनाचा शुभारंभ करण्यात आला गुळापासून बनवलेल्या विविध पदार्थांचे तसेच त्याचे आपल्या शरीरा होणारे फायदे याचे मार्गदर्शन महेंद्र चव्हाण यांनी केले.
आपल्या आरोग्यासाठी लाभदायक अशा गुळापासून बनवलेल्या विविध उत्पादनांची खरेदी करा त्याचबरोबर आपण व्यवसायातही सहभागी व्हावे असे आव्हान स्फूर्ती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मराठा उद्योजक लॉबीचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष, मनपसंत वधू वर सूचक संस्थेचे अध्यक्ष मंगेशजी शेळके पाटील, मातोश्री हाॅस्पिटल च्या महिला रोगतज्ञ डॉ ज्योती साबळे, सर्जन व लॅप्रोस्कोपी सर्जन डॉ ज्ञानेश्वर मोहरे, इंडिया न्युज वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक माधव पंजाबी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप सिंग, शांताराम झावरे, अशोक खंडागळे, लक्ष्मण शिंपी,सुरज पवार, क्रांती पाटील, लक्ष्या प्रि स्कूल शिक्षिका ज्योती चौधरी, रंजना माने, ज्योती गाढवे, सुवर्णा दुशिंग, मनिषा मोरे, छाया मिरकुटे, सोनाली माने, वर्षा सोनावणे, फोटोग्राफर प्रभाकर पवार, आयुष सांबे यांनी विशेष मेहनत घेतली. स्फूर्ती फाउंडेशनच्या कार्याला विशाल दामले, भरत पाटील, विनोद शेलकर, अरूण निमगिरे, जे.सी. गुप्ता, विशाल जगताप, निश्चल रत्नपारखी, शशिकांत पात्रे, भाग्यश्री पाटेल, अर्जून बिराजदार, संतोष बोरचटे, शोभा भोईर, योगेश जगदाळे यांनी विशेष हातभार लावला.
लाभार्थी महिलांनी स्फूर्ती फाउंडेशनचे आभार मानले, त्याचबरोबर त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी बाबत त्यांनी स्फूर्ती फाउंडेशन कडे तक्रार केली शासकीय दाखले वेळेत उपलब्ध होत नाही आणि शासकीय कार्यालयामध्ये दाखल मिळण्यासाठी वेळोवेळी पैशाची मागणी केली जाते लवकरच याबाबतीत स्फूर्ती फाउंडेशन व मराठा उद्योजक लांबीच्या माध्यमातून संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन या तक्रारीवर बैठक घेण्याचे आश्वासन या माध्यमातून देण्यात आले बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे व पदाधिकारी यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment