Monday, 26 June 2023

माणगांव रेल्वे स्थानक येथे वाढीव रेल्वे गाड्यांना थांबा देणे तसेच पनवेल ते वीर मेमू ट्रेन चालू करण्याची मागणी !!

कुणबी युवा मंच मुंबई (रजि ) ता. माणगांव, च्या वतीने रेल्वे प्रशासनाला दिले निवेदन !!

*माणगांव रेल्वे स्थानक येथे वाढीव रेल्वे गाड्यांना थांबा  देणे तसेच पनवेल ते वीर मेमू ट्रेन चालू करण्याची मागणी*

मुंबई, (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर) :

               कुणबी युवा मंच मुंबई (रजि.) ता. माणगांव च्या वतीने रेल्वे प्रशासनाला निवेदन  दिले. श्री.अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे मंत्रालय, भारत सरकार, श्री.रावसाहेब दानवे- रेल्वे राज्यमंत्री- भारत सरकार, श्री.अनिलकुमार लोहाटी, रेल्वे बोर्ड, श्री.नरेश लालवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे श्री.संजय गुप्ता, व्यवस्थापक व संचालक, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांना माणगांव रेल्वे स्थानक येथे वाढीव रेल्वे गाड्यांना थांबा देणे तसेच पनवेल ते वीर मेमू ट्रेन चालू करण्याची मागणी असणारे पत्र देण्यात आले. यावेळी कुणबी युवा मंच मुंबई (रजि.) तालुका माणगाव च्या वतीने
अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खराडे, सचिव श्री सत्यजित भोनकर, सहसचिव श्री निलेश खडतर आणि कमिटी सदस्य उपस्थित होते.

               दक्षिण रायगड जिल्हा मधील माणगांव, महाड, पोलादपूर, तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुका मधील असंख्य नागरिक नोकरी, व्यवसाय निमित्ताने मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई -विरार,पालघर, सुरत अशा महामुंबई लगत वास्तवात (राहायला ) आहेत. हे सर्व तालुका साठी आणि रायगड जिल्हा मधील माणगांव स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण, रेल्वे स्थानक आहे. रस्ते महामार्ग प्रवास खडतर, खर्चिक आणि वेळखाऊ असल्यामुळे  मोठ्या संख्येने प्रवासी यांची रेल्वे प्रवासाला प्रथम पसंती असते. तसेच माणगांव तालुका मुंबई पासून जवळ असल्याकारणाने प्रवासी वारंवार ये -जा करत असतात परंतु माणगांव स्थानकात प्रवासी संखेच्या प्रमाणात तेवढ्या गाड्या उपलब्ध नाहीत.
            तर आता रोहा वीर दुहेरीक झाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल  मंडगाव, जनशताब्दी एक्सप्रेस. लोकमान्य टिळक टर्मिनल त्रिवेंद्रम, नेत्रावती एक्सप्रेस, टिळक एक्सप्रेस, तिरुनेलवली एक्सप्रेस, कोचिवेल्ली एक्सप्रेस व इतर गाडयांना माणगांव स्थानक येथे थांबा देणे व मुंबई माणगांव वीर दरम्यान मेमो गाडी चालू करणे. यात रत्नागिरी पेसेंजर गाडी ४ आरक्षण डब्बे देऊन पूर्वी प्रमाणे दादरपर्यंत चालवणे. सावंतवाडी दिवा एक्सप्रेस दिवा साठी काही आरक्षित डब्बे ठेऊन दादर पर्यंत चालवणे. एक्सप्रेस गाड्यांमधील माणगांव स्थानकातील आसन आरक्षण कोटा वाढवणे. या मागण्यांसाठी निवेदन दिले असून याचा पाठपुरावा केला जाईल असे सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...