Monday, 26 June 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग व ह्युमॕनिटी ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने द्रुतगती महामार्गावर वृक्षरोपण !!

बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग व ह्युमॕनिटी ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने द्रुतगती महामार्गावर वृक्षरोपण !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

               बृहन्मुंबई महानगरपालिका एन विभाग व ह्युमॕनिटी ग्लोबल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने उपनगरातील पूर्व द्रुतगती महामर्गावरील घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच  पार पडला. एन वार्डचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी महामार्गावर विविध शेकडो प्रजातीची झाडे लावण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता मारुती पवार व उद्यान विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच ह्युमॕनिटी ग्लोबल फाऊंडेशनचे पदाधिकारी दिपक पवार, संतोष उनवणे, अनंत खडतरे व सहकारी राजेंद्र पुजारी, उदय पुजारी, राकेश बामणे, सुभाष भातुसे, सुनिल पाटिल, शिवाजी पिंपळे, प्रभाकर कुटे, विजय गड्डम, मनिष पालांडे, अमोल माईल उपस्थित होते. लायन्स क्लब आॕफ मुंबई सिल्व्हर ओक यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट दिली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...