Monday, 26 June 2023

कल्याण तालुक्यात सर्पदंश व विंचू दंशाच्या रुग्णांत वाढ, गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचार !!

कल्याण तालुक्यात सर्पदंश व विंचू दंशाच्या रुग्णांत वाढ, गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचार !!

कल्याण, (संजय कांबळे) : पावसाने सुरुवात केली असल्याने शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे. अशात सर्प दंश व विंचू दंशाच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. गोवेली ग्रामीण रुग्णालयात यांच्या वर उपचार करण्यात येत असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे अवाहन रुग्णालय प्रशासनाकडून केले जात आहे.

सध्या कल्याण तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केली आहे. अशावेळी सरपटणारे प्राणी यामध्ये साप, विंचू व इतर यांच्या बिळात पाणी शिरल्याने हे प्राणी बाहेर पडतात, नेमक्या याच वेळी शेतकरी, शेतीची मशागत, तर घरातील महिला लाकूडफाटा सुरक्षित ठिकाणी ठेवतात व ते या प्राण्यांच्या संपर्कात येताच दंश केला जातो. आतापर्यंत गोवेली ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाचे ८/१० तर विंचू दंशाचे १०/१२ रुग्णावर उपचार करण्यात आले आहेत. घोटसई, अनखरपाडा, दहागांव, आदी आजूबाजूच्या गावातील हे पेशंट असून ते वेळेवर रुग्णालयात दाखल झाल्यानें त्यांचेवर योग्य उपचार झाले.

काही साप हे खूपच विषारी असतात तर काही बिनविषारी असतात. माणूस केवळ भिती मुळे खूप घाबरतो व त्यातच दगावण्याची शक्यता असते. चावलेला साप व त्याच्याबद्दल ची सर्व माहिती डॉक्टरांना दिली तर ते योग्य व वेळीच उपचार सुरू करून रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न करु शकतात. आपण अंधश्रद्धा व इतर ऐकिवात गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर मात्र पेंशटसाठी हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे असे न करता ताबडतोब रुग्णालयात उपचारासाठी जायला हवे असे वैद्यकीय अधिकारी सल्ला देतात.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...