Friday, 2 June 2023

दहावीच्या निकालात परत मुलींनीच मारली बाजी !!

दहावीच्या निकालात परत मुलींनीच मारली बाजी !!

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या निकालात देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींचा निकाल हा 95.87 टक्के लागला. विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा 98.11 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल हा नागपूर विभागाचा 92.05 टक्के तर एकूण निकाल 93.83 टक्के लागला आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. 

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४१ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख २९ हजार ०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यातील १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेस नोंदणी केलेल्या एक वा दोन विषयात उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीप्रमाणे 'एटीकेटी'ची सुविधा लागू राहील.

No comments:

Post a Comment

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती !

डॉ. अविनाश सकुंडे यांची आंतरराष्ट्रीय इ.व्हि.आणि ए.आय. चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पदी नियुक्ती ! मुंबई, (शांतार...