Monday, 5 June 2023

कल्याण डोंबिवली परिसर पूर्णपणे कचरा मुक्त करणे हेच आपले उद्दीष्ट असेल पाहिजे !

कल्याण डोंबिवली परिसर पूर्णपणे कचरा मुक्त करणे हेच आपले उद्दीष्ट असेल पाहिजे !

कल्याण, नारायण सुरोशी : कल्याण डोंबिवली परिसर पूर्णपणे कचरा मुक्त करणे हेच आपले उद्दीष्ट असेल पाहिजे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी आज केले. महापालिका मुख्यालयाजवळील सुभाष मैदान येथे आज सकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या 43 घंटा गाडयांचे ( स्वच्छ भारत मिशन 1 मधून) लोकार्पण करतेवेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. या गाडयांबरोबरच आपण 13 मोठे रिफ्युज कॉम्पॅक्टर खरेदी करत आहोत त्याच बरोबर 4 मेकॅनिकल पॉवर स्विपर (स्वच्छ भारत मिशन 2 मधून) आणि धुळ नियंत्रण ठेवण्यासाठी 2 फॉगिंग मशिन पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाच्या, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी मधून  खरेदी करत आहोत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

घनकचरा व्यवस्थापन विभागात आता सर्व सीएनजी वर चालणारी वाहने घेण्यात येणार आहेत त्यामुळे महापालिकेची आर्थिक बचत पण होणार आहे त्याबरोबर कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होणार आहे आपण जे‍ नविन प्लान्ट नव्याने उभारत आहोत (प्रोसेसिंग प्लांट) त्यामध्ये ओल्या कच-यापासून सीएनजी प्लांट उभारणार आहोत आणि त्यामुळे नविन गाडया या सीएनजीवर चालतील अशी माहिती आयुक्त डॉ. दांगडे यांनी यावेळी दिली.

या समयी घनकचरा व वाहन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील, महापालिका सचिव संजय जाधव, स्वच्छ भारत मिशन अभियानाचे महापालिकाचे ब्रॅन्ड ॲम्बसेडर डॉ.प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता प्रविण प्रवार, महापालिका सहा.आयुक्त हेमा मुंबरकर, दिनेश वाघचौरे, संजयकुमार कुमावत,भरत पाटील, उपमुख्य स्वच्छता अधिकारी घुटे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...