नविन घराच्या गृहप्रवेश कार्यक्रम निमित्त वृक्षारोपण !
जव्हार, जितेंद्र मोरघा :
शिरसगाव येथील ग्रामस्थ कृष्णा पांडुरंग जाधव यांच्या नवीन घराच्या गृहप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्ताने निसर्ग पुजन, महापुरषांच्या प्रतिमेचे पूजन तसेच आदिवासी देवतांचे पूजन करण्यात आले, यावेळी प्रदीप वाघ उपसभापती यांच्या हस्ते वडाच्या झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बोलताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की आदिवासी माणूस हा निसर्ग पुजक आहे आणि आज वटपौर्णिमा आहे म्हणून कृष्णा जाधव यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक आहे, शिवाय, भेट वस्तू ऐवजी शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी वस्तू द्या या त्यांच्या अवहानाला प्रतिसाद मिळाला आहे, या शैक्षणिक वस्तू ते अनाथ मुलांना वाटप करणार आहेत हे खुप महान कार्य आहे असे देखील प्रदीप वाघ यांनी सांगितले
राजेन्द्र जागले यांनी घरभरणी कार्यक्रम व मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदीप वाघ यांच्या सह नवले पोशेरा सरपंच, नंदकुमार वाघ उपसरपंच विठ्ठल गोडे पोलिस पाटील, दशरथ पाटील, धनगरे सर रघुनाथ गांगुर्डे, देवचंद जाधव, दिवा गुरुजी, परीसरातील मान्यवर व कृष्णा जाधव यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment