विनवळ गावचे मधुकर दिघा यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम सोहळा संपन्न !!
जव्हार, जितेंद्र मोरघा :
जव्हार तालुक्यातील विनवळ ग्रामिण भागातील मधुकर दिघा यांचा सेवानिवृत्त कार्यक्रम सोहळा विनवळ (गावठण) येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे माजी पालघर जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा थेतले आणि जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्ष विठ्ठल थेतले यांनी शाल पुष्प गुच्छ देवुन त्यांचे स्वागत केले.
मधुकर दिघा हे शासकिय पशुवैद्यकीय सेवेत १९८६ या साली त्यांची सेवेत रुजु झाले, मधुकर दिघा हे ग्रामिण भागात त्यांना सर्व्हीस असल्यामुळे ते गावो गावी खेडोपाडी गावी जाऊन जनावारांना कोणताही आजार असो त्या जनावरांचा उपचार करत होते एखाद्या नागरिकाचा फोन आला रात्री कींवा दिवसा कोणत्याही वेळेत ते त्या ठीकाणी जाऊन जणावरांचा उपचार करुन चांगल्या प्रकारची ग्रामिण भागात सेवा देत होते. तसेच आलेल्या पाहुण्यांचे, ग्रामस्थांचे त्यांना भोजनाची चांगल्या प्रकारे व्यवस्था केली होती. आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन त्याचे स्वागत केले. यावेळी माजी पालघर जिल्हा अध्यक्षा सुरेखा थेतले, जामसर ग्रामदान मंडळ अध्यक्ष विठ्ठल थेतले, मोखाडा तालुका नगराध्यक्ष नवशु दिघा, जव्हार माजी सभापती तुळशिराम मोरघा, गंगा माळी, उपसरपंच बोराळे कुसन चिभडे, पत्रकार जितेंद्र मोरघा, केशव दिघा, काशिनाथ दिघा, कमळाकर भोरे, अशोक भोरे, संदिप खुताडे, रशा दिघा, प्रभाकर भुसारा, हनुमंत मोरघा, सचिन मोरघा, जिग्नेश दिघा, जितेश दिघा, संतोष मोरघा, रविंद्र बारडी, निलेश मोरघा आणि दिघा कुटुंब, ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment