Sunday, 4 June 2023

वाढदिवसानिमित्त राजूभाई मेहता यांच्यातर्फे अनाथ मुलांना साहित्य वाटप !!

वाढदिवसानिमित्त राजूभाई मेहता यांच्यातर्फे अनाथ मुलांना साहित्य वाटप !!

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) :

          जेष्ठ समाजसेवक, जनसेवा संघ संस्थापक राजूभाई मेहता यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच खाण्याचे साहित्य वाटप करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून जेष्ठ समाजसेवक, जनसेवा संघ संस्थापक श्री.राजूभाई मेहता हे मुलांमध्ये आपला वाढदिवस साजरा करून मुलांना वस्तू भेट म्हणून देतात. गरीब आणि रस्त्यावरील अनाथ मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात.ज्येष्ठ समाजसेवक श्री.राजुभाई मेहता यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. लहान अनाथ मुलांसाठी तसेच आश्रमासाठी राजूभाई मेहता अविरत मेहनत घेतात. यावेळी श्री.सुनील पाटील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपविभाग प्रमुख- बोरिवली, श्री.संदीप परब उपशाखा प्रमुख, श्री.मिलन सावंत, श्री.रवि ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते. जनसेवा संघाचे संस्थापक श्री.राजूभाई मेहता यांना यावेळी अनेकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !

शिवस्मारक समिती संस्थापक/अध्यक्ष शिवभक्त संजय दादा भालेराव यांच्या नेतृत्वाखाली घाटकोपर मध्ये शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा !  ** अवघे व...