देशाची सुवर्ण युगाकडे वाटचाल - केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील
कल्याण, प्रतिनिधी : भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार, केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज दि. ०४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षात केलेले कार्य व महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती.
यावेळी बोलताना केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाचा झालेला विकास तसेच आपल्या मतदारसंघातील विकास यावर भाष्य केले. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्य धान्य, २२० कोटी मोफत डोस, आयुष्यमान योजनेतून पाच कोटी रुग्णांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, साडेतीन कोटी कुटुंबांना पक्के घर, ११ कोटी ७२ लाख शौचालये, १२ कोटी घरात पाणी, साडेनऊ कोटी भगिनींना मोफत गॅस जोडणी, जनऔषधी केंद्रावर स्वस्त औषधी, १ रुपयात सॅनिटरी नॅपकीन, प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये, गरीबांसाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी हे कार्यरत असलेले सरकार आहे असे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले.
तसेच जम्मू काश्मिरातून ३७० कलम रद्द, ५२८ वर्षापासून प्रतिक्षेत असलेले राममंदिर, केदारनाथ धाम पुनर्निर्माण, काशी विश्वनाथ, सोमनाथ कॉरिडॉर, लोकशाहीचे नवे मंदिर असलेली नवी संसद, असे न भूतो न भविष्यती असे निर्णय घेतले.
पुढे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांच्या काळात ७४ नविन विमानतळ, तब्बल ५३ हजार ८६८ किमी नविन महामार्ग, १११ नवे जलमार्ग, १५ नविन मेडिकल कॉलेज, १५ एम्स हॉस्पिटल, सात आयआयटी, १३ आयआयएम, ३०९ विद्यापीठे सुरू झाली. जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर भरारी घेतली, संपुर्ण जगात देशाचा सन्मान वाढविला. पंचायती राज विभागाच्या माध्यमातून देशातील दोन लाख ३८ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा विकास केला.
यावेळी आपल्या मतदारसंघातील मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कल्याण -मुरबाड रेल्वे मार्ग, ठाणे -भिवंडी -कल्याण मेट्रो, आठ पदरी माजिवडा -वडपे बायपास, शहापूर -खोपोली महामार्ग असे अनेक महत्त्वाच्ये प्रकल्प मार्गी लागले असून भिवंडी मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगवली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.
आजच्या पत्रकार परिषदेला भिवंडी चे आमदार महेश चौगुले, भारतीय जनता पक्षाचे भिवंडी अध्यक्ष संतोष शेट्टी, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे मा. नगरसेवक वरुण पाटील, कोनगावाच्या सरपंच रेखा सदाशिव पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सदस्य प्रिया शर्मा, कल्याण शहर महिला अध्यक्ष ज्योती भोईर तसेच मतदारसंघातील अनेक पदाधिकारी व पत्रकार मोठ्या प्रमाणावर या पत्रकार परिषदेस उपस्थित होते.
No comments:
Post a Comment