Tuesday, 20 June 2023

आश्रमशाळा दुरुस्ती मध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करु 'बविआ' !!

आश्रमशाळा दुरुस्ती मध्ये झालेल्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करावी अन्यथा आंदोलन करु 'बविआ' !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

  जव्हार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील जव्हार प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह मॅडम यांची भेट घेऊन जव्हार प्रकल्प कार्यालय मधे बांधकाम विभागात आश्रम शाळा दुरुस्तीची कामे वाटपात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला आहे त्याची चौकशी करण्यात यावी व जव्हार प्रकल्पातील ठक्कर बाप्पा योजनेची कामे वाटपात भारतीय जनता पक्षाच्या ग्रामपंचायत ला दिलेला स्थान व शाळा दुरुस्तीची कामे वाटप ही भारतीय जनता पक्ष सांगेल त्या प्रमाणे कामे वाटप सुरू आहे. अधिकारीही भारतीय जनता पक्षाच्या तालावर नाचत असतील तर सर्व सामान्य जनतेचे काय हाल असतील ते न सांगितलेले बर या संधर्भात निवेदन देऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली व कारवाई केली नाहीतर जव्हार तालुका बहुजन विकास आघाडीकरून आंदोलन करण्यात येईल.यावेळी बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा, तलासरी ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील, माजी सरपंच संजय भला, राजेश वातास ग्रामपंचायत सदस्य संतोष भला, वंदना ठोंबरे, सुनील दखणे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...