श्री पी. एल. श्रॉफ महाविद्यालयात करिअर संसदेची स्थापना !
(ऑनलाईन वृत्तसेवा) : दि.२४ : चिंचणी-तारापूर शिक्षण संस्थेच्या श्री. पी. एल. श्रॉफ कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या करिअर कट्टा या विभागाची प्रथम सभा संपन्न झाली. या सभेमध्ये प्राचार्य डॉ. प्रमिला राऊत यांनी विद्यार्थ्यांना करियर कट्ट्याचे महत्त्व सांगून त्याचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. समन्वयक अण्णा डोंगरदिवे यांनी महाविद्यालयात चालणाऱ्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि करिअर कट्टा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यानंतर डॉ. प्रेरणा राऊत, कॅप्टन डॉ. वनश्री फाळके, लेफ्टनंट प्रकाश सोनवणे, डॉ. ज्ञानेश्वर भोसले या प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी 'करिअर संसदे'ची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्याद्वारे राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ही एकूण ११ विद्यार्थ्यांची संसद स्थापन करण्यात आली. करिअर संसदेच्या चुरशीच्या या लढतीत अध्यक्ष म्हणून जितेंद्र पाटील, तर वृज्ञा घरत आणि प्रांजल पाटील या विद्यार्थ्यांची सेक्रेटरी म्हणून निवड झाली. तसेच इतर आठ विद्यार्थ्यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. निवड केलेल्या संसदेतील विद्यार्थ्यांना डी.एल.एल.ई. विभागाच्या वतीने रोप भेट देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आभारप्रदर्शन प्रा. चित्रा अष्टेकर यांनी केले. यावेळी करिअर कट्ट्याचे सदस्य प्रा. गौरी दातीर, प्रा. अमिता बारी, प्रा. विद्या दहिसरकर, डॉ. विशाल वाणी, प्रा. जिज्ञा मोरे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment