कल्याण येथील नूतन विद्यालयात जिजाऊ संस्थेची तलाठी व वन विभाग भरतीसाठी मोफत कार्यशाळा संपन्न !
*३५० विद्यार्थ्यांनी घेतले तलाठी आणि वनविभाग भरतीचे मोफत मार्गदर्शन*
कल्याण, प्रतिनिधी : कल्याण येथील नूतन विद्यालयात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची तलाठी आणि वन विभाग पदांसाठी मोफत कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
आगामी काळात केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अनेक रोजगाराच्या संधी विद्यार्थ्यांसाठी व युवकांकरिता उपलब्ध होणार आहेत. राज्यात तलाठी आणि वन विभागाची सर्वात मोठी भरती होणार असून तलाठी पदासाठी ४६६४ पदे भरण्यात येणार आहे. तर वनरक्षक पदासाठी २१६१ पदे भरण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे कृषी सेवक केंद्र व राज्य शासनाच्या क व ड पदासाठी देखिल मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे.
या उद्देशाने युवकांना रोजगार मिळावा तसेच युवकांना सरकारी नोकरीची संधी मिळावी म्हणून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कोकण विभागात ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी येथे भरती पूर्व मोफत मार्गदर्शन भरविण्यात येत आहे. याच अनुषंगाने ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव यांच्या सहकार्याने कल्याण परिसरातील विद्यार्थी व युवकांकरिता नूतन विद्यालयात तलाठी व वन विभाग भरती पूर्व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ३५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होऊन मोफत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी जळगाव जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य तसेच जिजाऊ संस्थेचे प्रोजेक्ट हेड संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले तसेच स्पर्धा परीक्षांच्या भरती करिता कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे. स्पर्धा परीक्षांचा पेपर कसा सोडवायचा कोणत्या चुका टाळायच्या कोणत्या प्रश्नांना प्राधान्य द्यायचे तसेच तलाठी व वनविभाग परीक्षेसाठी काय तयारी करायला पाहिजे यासाठी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र पुणे येथील पांडुरंग कुटले यांनी देखील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले वेळेचे नियोजन आणि अभ्यासात जास्तीत जास्त कौशल्याचा अभ्यास करून निर्भीड होऊन परीक्षा कशी द्यावी या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जिजाऊ संस्थेचे ठाणे जिल्हा उपक्रम प्रमुख अजित जाधव विद्यार्थ्यांना म्हणाले *जिजाऊ संस्थेने आत्तापर्यंत अनेक अधिकारी घडवले आहेत जिजाऊ संस्थेच्या यूपीएससी एमपीएससी अभ्यास केंद्रातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी आपले अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करतात. म्हणूनच जिजाऊ संस्थेला अधिकारी बनवणारी फॅक्टरी म्हणून संबोधले जाते.
जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कोकणातील ४७ तालुक्यात ५० स्पर्धा परीक्षांच्या केंद्राच्या माध्यमातून यावर्षी पाच हजार विद्यार्थ्यांना अधिकारी बनविण्यासाठी मिशन ५००० ही मोहीम कोकणातील प्रत्येक तालुक्यात राबविण्यात येत आहे. येणाऱ्या काळात पाच हजाराहून अधिक अधिकारी बनविण्याचे स्वप्न जिजाऊ संस्थेने उराशी बाळगले आहे असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजित जाधव यांनी सांगितले. यावेळी जिजाऊ पोलीस अकॅडमी प्रमुख अरविंद देशमुख अजित जाधव नूतन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सय्यद मॅडम जिजाऊ संस्था सदस्य मंदार काठोळे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत क्षीरसागर कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेंद्र अंभोरे अंबरनाथ तालुकाप्रमुख वैशाली सावंत, अश्विनी झगडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जिजाऊ संस्था सदस्य संदीप शेंडगे, अरविंद जाधव, रुपेश पाटील, साहिल मगर, वैभव पवार, संकेत देवरुखकर, मोनीका उज्जैनकर यांनी मेहनत घेतली तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र अंभोरे यांनी केले.
No comments:
Post a Comment