कल्याण येथील "मोहित गायकवाड ॲट्रॉसिटी प्रकरणी कार्यकर्त्यांच्या दणक्यानंतर तब्बल दोन महीन्यांनी प्रशासकीय हालचाली सुरु....
*आरोपींना अटक करण्यास हयगय प्रकरणी जिल्हाधिकारी, ठाणे यांच्या कडे तक्रार*
कल्याण (प्रतिनिधी ) - कल्याण येथील अल्पवयीन अनुसुचीत जातीच्या मुलाची अर्धनग्न धिंड काढून १००/१५० च्या जमावाने मारझोड केल्या प्रकरणी दाखल असलेल्या *ॲट्रॉसिटी* गुन्ह्याचा तपास संथगतीने सुरु असुन गुन्ह्यातील निम्म्याहून जास्त आरोपी अद्यापही अटक करण्यात आलेले नाहीत. पिडीत कुटूंबाला तात्काळ अर्थसहाय्य देवुन त्यांना शासनाने मदत करणे बंधनकारक असतानाही अद्याप त्यांना शासकीय मदत देण्यात आलेली नाही.
गंभीर ॲट्रॉसिटी प्रकरणात सबंधित जिल्हाधिकारी जिल्ह्य़ातील वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी यांनी पिडीत कुटूंबियांना व घटना स्थळी भेटी देऊन पोलीस प्रशासनाला ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याबाबतचे आदेश देवुन शासनास अहवाल सादर करावयाचे अपेक्षीत असतांना प्रत्यक्ष असे काही न घडता पोलीस प्रशासनाकडून सदर गुन्ह्याचा तपास अत्यंत संथगतीने सुरू आहे. या गुन्ह्य़ात निम्म्याहून अर्धेअधिक आरोपी अटक होणे बाकी आहे. याबाबत पिडीत कुटूंबाकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दोनदा पत्रव्यवहार करण्यात आला. अनेकदा आरोपींच्या अटकेची मौखिक मागणी करुनही तांत्रिक अडचणी सांगुन आरोपींना अभय देण्यात येत असल्याची बाब लक्षात आल्याने आणि पोलीस प्रशासन हे राजकीय दबावाखाली असल्याचा संशय बळावल्याने जेष्ठ समाजसेवक पत्रकार तथा मानवाधिकार संरक्षक अण्णा पंडित, अॅड रोहित कांबळे, अजय सावंत यांनी पिडीत कुटूंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा न्यायदंडाधिकारी सुदाम परदेशी साहेब तसेच सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ठाणे समाधान इंगळे यांची भेट घेऊन मोहित गायकवाड प्रकरणाची माहिती दिली.
अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा असतांना सुद्धा जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल न घेता ॲट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी प्रभावी होत नसल्याची बाब अण्णा पंडित यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्याने आज तातडीने जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती सदस्य आणि समाजकल्याण निरीक्षक महेश अळकुटे जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी पवार यांनी कल्याण येथे येऊन पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेतली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णा पंडित उपविभागीय दक्षता आणि नियंत्रण समिती सदस्य राजन गायकवाड, रागीनी चवरे, नागरी हक्क संरक्षण विभाग कल्याण च्या पोलीस निरीक्षक कविता भोसले, घोरपडे, माकपचे दोन प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांना घटनास्थळाची पाहणी करून पीडितांचे घरी भेट देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, कल्याण शासनाने प्रतिनिधी यांचेसह भेट देणे कामी जायचे असल्याचे सांगितले त्यांनी तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त, कल्याण आणि खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना भेटीसाठी सुचविले. उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी कल्याण *अभिजीत भांडे पाटील* यांच्या दालनात बैठक होऊन त्यांनी पिडीताच्या वतीने सविस्तर म्हणणे ऐकुन घेतले. *अॅड. जय गायकवाड* *अण्णा पंडित* यांनी ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत येणाऱ्या तरतुदींच्या अनुषंगाने पिडीत कुटूंबाला तात्काळ अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. आरोपींना अद्याप का अटक करण्यात आली नाही या बाबतचा अहवाल पोलीस प्रशासनाकडून घ्यावा तसेच येत्या आठ दहा दिवसांत उर्वरित आरोपी अटक न झाल्यास अरुमुगन सरवई विरुद्ध तामिळनाडू राज्य या केसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रातील निर्देशानुसार संबंधीत पोलीस अधिका-यांचा निलंबन प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची मागणी पिडीताच्या वतीने अॅड जय गायकवाड यांनी केली. बैठकीनंतर उपविभागीय अधिका-यांनी पहाणी दौरा सुरू केला हखडकपाडा पोलीस ठाणे, गुन्ह्यातील तीनही घटना स्थळांची पाहाणी करुन पिडीताच्या घरी जाऊन उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) डॉ. अभिजित भांडे पाटील यांनी पिडीत व्यक्ति मोहित गायकवाड व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.
पाहणी दौऱ्यामध्ये उपविभागीय अधिकारी, कल्याण डॉ. अभिजित भांडे पाटील यांचे सह त्यांच्या समीतीचे सदस्य राजन गायकवाड, डॉ. रागीनी चवरे, समाजकल्याण निरीक्षक महेश अळकुटे, जिल्हा प्रतिनिधी पवार, ना. ह. स. कल्याण विभाग पोलीस निरीक्षक कविता भोसले, घोरपडे, गटविकास अधिकारी कल्याण यांचे प्रतिनिधी, अॅड.जय गायकवाड, स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय निरीक्षक अण्णा पंडित, अजिंठा फाउंडेशनचे अजय सावंत, करण धनगर, वाघमारे, मानसी गायकवाड इत्यादी कार्यकर्ते समिती सोबत उपस्थित होते.
No comments:
Post a Comment