पत्रकार पंकजकुमार पाटील यांना 'समाजभूषण' आणि निर्भीड जागल्या हे दोन पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान !!
मुंबई, प्रतिनिधी : दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी आर्यारवी एंटर टेनमेंट प्रस्तुत राष्ट्रीय आणि आंतर राष्ट्रीय लघुपट महोत्सवचे (वर्ष ४ थे) आयोजन शिरोडकर हायस्कूल -परेल, मुंबई येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना रंगकर्मी, कलाभूषण, समाजभूषण असे पुरस्कार दिले गेले.
याच कार्यक्रमात पत्रकार पंकजकुमार पाटील यांना "समाजभूषण" देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास मुख्य आयोजक, अभिनेते, दिग्दर्शक व पत्रकार महेश्वर तेटंबे यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक सतीश पुळेकर, ज्येष्ठ गायक व गझल नवाझ भीमराव पांचाळे, ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक के. राघवकुमार , ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर (आप्पा )तोडणकर, ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक गुरुनाथ तिरपणकर, ऍड. सुनिल शिर्के, अभिनेत्री सिद्धी कामत व इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ वृत्तपत्र लेखक मधु शिरोडकर यांच्या 'कालप्रवाह' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मामा काणे हाॅटेल सभागृह, दादर (पश्चिम ), मुंबई येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 'कालप्रवाह' या पुस्तकाचे प्रकाशन पद्मश्री उदय देशपांडे, दै.नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. याप्रसंगी विविध वृत्तपत्रलेखक, पत्रकार यांना निर्भीड जागल्या पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमात पद्मश्री उदय देशपांडे यांच्या हस्ते पंकजकुमार यांना दिलीप दळवी पुरस्कृत, "निर्भीड जागल्या" पुरस्काराने गौरवण्यात आले.
कांजूरमार्ग मुंबई येथील पत्रकार तसेच आदर्श वार्ताहर या पाक्षिक वृत्तपत्र व न्यूज पोर्टल चे संपादक पंकजकुमार पाटील गेली २० वर्षाहून अधिक काळ पत्रकारिता करीत आहेत. विविध वृत्तपत्रातून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक,क्रीडा, राजकीय व इतर विषयांवर वृत्तपत्रलेखन केले आहे. तसेच विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना ते बातम्यामधून प्रसिद्धी देत असतात. तसेच गेली सहा वर्षे स्वतःचे आदर्श वार्ताहर पाक्षिक नित्यानियमाने मेहनतीने, हिमतीने प्रकाशित करीत आहेत.या आधी त्यांना वेगवेगळ्या पत्रकार संस्था, संघटना यांच्याकडून आदर्श व उत्कृष्ट पत्रकार यासह इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
२०२६ वर्षाच्या पहिल्याच महिन्यात पत्रकारदिनी त्यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर आता मिळालेल्या दोन वेगळ्या पुरस्काराबद्दल त्यांचे नातलग, मित्रपरिवार, पत्रकार बांधव, समाजातील मान्यवर व्यक्ती यांच्याकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
No comments:
Post a Comment