शेतकऱ्यांना व्यवसायिक शेतकरी म्हणून उभारी देण्यासाठी सरसावली जिजाऊ संस्था !
*जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*
मुरबाड, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि कृषी व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी मुरबाड तालुक्यातील विविध गाव परिसरांतून मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग उपस्थित होता. या शिबिरास सुमारे ५०० च्या आसपास शेतकरी बांधवांनी उपस्थिती लावत लाभ घेतला.
या शिबिरात शेतीपुरक असणाऱ्या जोडधंद्याविषयी मार्गदर्शन, भाजीपाला शेतीविषयक माहिती, बंदिस्त व मुक्तसंचार कुक्कुटपालन कसे करावे?, दुग्धव्यवसायासंबंधी मार्गदर्शन, बंदिस्त शेळीपालनाबाबत माहिती, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या शेतकरी लाभाच्या योजनेची माहिती तसेच बँकेच्या कर्जाविषयी माहिती व कर्ज मिळवुन देण्याबाबत या प्रमुख मुद्द्यांवर या शिबिरात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पुण्यातील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीचे ओंकार मोरडे यांनी विविध शेतीपूरक व्यवसाय विषयांवर व शेतीविषयक योजनेची माहिती दिली. तर वाडा कृषी सहाय्यक सागर पाटील, यांनी कृषि विभाग अंतर्गत लागणारे बी बियाणे व योजनेची माहिती दिली. पशुसंवर्धन विभागातील मुरबाड पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ.चंदेल, पशुधन विकास अधिकारी, टोकावडे तथा दुग्धव्यवसाय प्रमुख डॉ.धनंजय आंदळे,यांनी शेळीपालन, दुग्ध व्यवसाय चारा व्यवस्तापन या संदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या प्रसंगी याप्रसंगी सौ.मोनिकाताई पानवे (भिवंडी लोकसभा प्रमुख तथा ठाणे जिल्हा प्रमुख), मुरबाड कृषीविभागातील कृषी अधिकारी नामदेव धांडे, कृषी पर्यवेक्षक नरेंद्र वसुकर, दि जव्हार अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन प्रविण मुकणे, संचालक ज्ञानेश्वर मोरे व नरेंद्र प्रभु, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती दिपक पवार, प्रगतशील कुक्कुटपालन शेतकरी यशवंत दांडे, आदिवासी विभाग विकास मंडळ अंतर्गत बिरसा मुंडा शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड चे सचिव पांडुरंग कमलू दरवडा आदी मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान धसई गावचे प्रगतीशील शेतकरी शशिकांत घोलप तसेच मुरबाड तालुक्यातील कुकुटपालन व प्रगतीशील शेतकरी यशवंत दांडे यांचा सत्कार करण्यात आले.
पुढील येणाऱ्या काळात जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतीपुरक व्यवसाय वाढविण्यासाठी सहकार्य करून, शेतकरी बांधवाचे दुध 'शेतकरी ते ग्राहक' हि संकल्पना राबविली जाईल, कुकुटपालन,शेळीपालन व्यवसाय करणाऱ्या व करू इच्छित असणाऱ्या शेतकऱ्याना योग्य प्राधान्य देवुन मार्केट व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी सहकार्य केले जाईल. असे या कार्यक्रमादरम्यान जिजाऊ संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.
निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकणातील शेती ही तोट्याची असू नये, ती जोडधंद्यांसह फायद्याचीच ठरावी यासाठी जिजाऊ सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम चालवत असते . त्यासाठी दरवर्षी शेतकऱ्यांना पाच लाख फळरोपे वाटपा बरोबरच इतरही उपक्रम राबवले जातात. कोकणामध्ये पाऊस आहे, पण शेतीसाठी, पिण्यासाठी बारमाही पाणी नसते. त्यामुळे शेतीच्या सक्षमीकरणासाठी नद्यांना बंधारे बांधून बारमाही शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोकणाजवळ मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारखी कोट्यवधी ग्राहकांची महानगरं असूनही दुग्ध व्यवसाय म्हणावा तेवढा नाही. त्यामुळे त्यास चालना देऊन सक्षम शेतकरी घडवण्याचाही जिजाऊ संस्थेचा मानस आहे.
No comments:
Post a Comment