Wednesday, 16 August 2023

जिजाऊ दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत स्वातंत्र दिन उत्साहात साजरा !!

जिजाऊ दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत स्वातंत्र दिन उत्साहात साजरा !!

पालघर, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने मोफत  चालवण्यात येत असलेल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झडपोली येथील जिजाऊ दिव्यांग मुलांच्या निवासी शाळेत देशाचा स्वातंत्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

या शाळेतील दिव्यांग मुलांनी विविध देशभक्तीपर गीते , नृत्य आणि भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी सौ.भवनादेवी भगवान सांबरे इंटरनॅशनल स्कूल येथील मुलांनी देखील विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करत उपस्थितांची दाद मिळवली .

जिजाऊ संस्थेच्या वतीने दिव्यांग मुलांसाठी २०१६ साली जिजाऊ दिव्यांग मुलांची निवासी शाळा चालू करण्यात आली होती . आज या शाळेत १०५ दिव्यांग मुलांचे पालकत्व जिजाऊ संस्थेच्या वतीने घेण्यात आले आहे. त्यांच्या कलागुणांना देखील या ठिकाणी वाव दिला जातो. येथील मुलांचा स्वंतत्र असा वाद्यवृंद देखील आहे. आयोजित करण्यात आलेल्या स्वांतत्र्य दिनाच्या कार्यक्रमात जिजाऊ संस्थेच्या वतीने उपस्थित मुलांना खाऊचे वाटप करत हा कार्यक्रम संपन्न झाला .

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...