स्वतंत्र दिनानिमित्त नालासोपारात महिलांसाठी मेहंदी व ब्युटी पार्लर स्पर्धांचे आयोजन....
वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारा शहरातील दत्त मंदिर समेळपाडा येथे महिलांसाठी मेहंदी व ब्युटी पार्लर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला महिलांचा उत्सुर्फ प्रतिसाद लाभला. मेहंदी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अनिता बुटे, व्दितीय क्रमांक मौसमी कुन्नल, तृतीय क्रमांक शलाका सकरे यांनी क्रमांक पटकविले.
ब्युटी पार्लर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक बबिता साहु, व्दितीय क्रमांक पुनम इंदुलकर, तृतीय क्रमांक प्रियंका खरात यांनी क्रमांक पटकाविले...
मेहंदी स्पर्धा व सौदर्य स्पर्धा या महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे या स्पर्धा म्हणजे केवळ सौदर्यावर आधारीत नसतात तर इथे बुध्दिमत्तेचाही कस लागतो. स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर महिलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना स्वतःला सिध्द करण्याची प्रेरणा मिळते. महिलांनी स्वावलंबी होऊन व्यवसायकपुरक दृष्टीकोन ठेवावा आणि सक्षमपणे काम करून आपल्या पायावर उभे रहावे या उद्देशाने अधिकाधिक महिलांना सर्व प्रकारचे मोफत प्रशिक्षण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून देण्यात येते.
अनेक महिला घरकामात गुंतलेल्या असतात त्यांना आर्थिकदृष्टया पतीवर अवलंबुन रहावे लागते या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण च्या माध्यमातुन महिलांसाठी हक्काचे व्यसपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये मेहंदी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवणकला प्रशिक्षण, अगरबत्ती निरमा पावडर प्रशिक्षण, मोफत देण्यात येते.
मेहंदी व ब्युटी पार्लर स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, वंदना ढगे ब्युटी पार्लर प्रशिक्षक संगिता पासी मेहंदी प्रशिक्षक हार्दी मॅडम यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment