Saturday, 5 August 2023

आव्हानांना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा - प्रदिप वाघ

आव्हानांना सामोरे जाऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवा - प्रदिप वाघ

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा,किनिस्ते जिल्हा परिषद केंद्र शाळा मध्ये पहिली शिक्षण परिषदांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी  प्रदीप वाघ उपसभापती हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी सांगितले की सध्या शिक्षक भरतीचा महत्वाचा विषय शासन स्तरावर प्रलंबित आहे त्यामुळे सर्व तालुक्यांत शिक्षक संख्या कमी आहे, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक अशी महत्वाची पदे रिक्त आहेत, त्यामुळे नक्कीच शैक्षणिक कामकाजात अडथळा निर्माण होत आहे.तरी देखील आपण या सर्व अडचणी वर मात करून ज्ञान दानाचे काम करावे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले. यावेळी केंद्र प्रमुख नागु विरकर, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, माजी सरपंच मंगेश दाते, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष प्रकाश मडके, शिक्षक संतोष पाटील, धनराज जाधव मुख्याध्यापक, सुहास दिनकर सरसर्व दोन्ही केंद्रातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !! उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय. सीबीडी पोलीस ठाण्यात ...