Friday, 4 August 2023

नागरिकांच्या कररूपी पैशावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नियोजित डल्ला !!


नागरिकांच्या कररूपी पैशावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा नियोजित डल्ला !!

*नेहमीचाच पावसाळा तेच रस्ते, तेच खड्डे, दरवर्षी करोडो खर्च, नागरिक त्रस्त*

*करपत्रका सोबत वार्षिक बजेट व जमा खर्च माहिती जोडावी स्फूर्ती फाउंडेशनची मागणी*

कल्याण, प्रतिनिधी - दिवाळी दसरा आणि हात पाय पसरा याप्रमाणे पावसाळा आला की कल्याण डोंबिवली महानगरपालिके कडे खड्डे बुजवून देण्यासाठी साठी विनवण्या करा.

*कर भरण्यासाठी डेडलाईन.. रस्ते दुरुस्ती साठी डेडलाईन कधी होणार*

*दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्त्यांवर खर्च होतो नागरिकांच्या कष्टाच्या पैशाची उधळपट्टी केली जाते 

करामधील दंडावर  थातूर मातूर सुट देऊन तिजोरी भरायची मग दर वर्षी पावसाळ्यात पुन्हा येरे माझ्या मागे तेच रस्ते, तेच खड्डे आणि खड्ड्यांनी हैराण झालेला करदाता भरतोय कर
कल्याण मध्ये रिक्षाला भोंगा लावून कर भरण्यासाठी तगदा लावणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुलभूत सोयी सुविधा साठी कधी रिक्षा फिरवणार हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

स्मार्ट सिटी ची व्याख्या काय ??? तर खड्डे पडलेले रस्ते, रस्त्यावर ठिकठिकाणी कचर्याचे ठिग, अनियमित पाणीपुरवठा, अरुंद मलनिस्सारण वाहिन्या, सार्वजनिक परिवहन वाहतूकचे वाजलेले तीन तेरा, भटक्या कुत्र्यांचा हौदास एक दिवस जनतेचा संयम सुटेल व जनप्रक्षोभ होईल  त्या वेळेची कल्याण डोंबिवली महानगरपालिका वाट पाहत आहे का? असा प्रश्न आता पडला आहे.

आज टावरीपाडा परिसरातील नागरीकांच्या वारंवार तक्रारी नुसार स्फूर्ती फाउंडेशन ने तक्रार केल्यानंतरही ब्र प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना देत रस्ता दूरूस्ती काम सुरू झाले यावेळी स्वतः जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांनी  उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजवून घेतले.

हा एक फक्त तात्पुरता दिलासा दिला माती मिश्रीत मुरूम टाकून रोलर मारून दिला ,डांबरीकरण बहुतेक गणेशोत्सव उत्सवा पर्यंत वाट पहावी लागेल.

स्फूर्ती फाउंडेशन ने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे नागरीकांना देण्यात येणाऱ्या कर पत्रकासोबत वार्षिक बजेट व जमा खर्च सोबत जोडला जावा अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !!

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक !! उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय. सीबीडी पोलीस ठाण्यात ...