Tuesday, 1 August 2023

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव !

महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव !

बदलत्या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी जनसेवेचे काम अविरत सुरू ठेवावे - जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, प्रतिनिधी - आजच्या बदलत्या युगात, माहिती तंत्रज्ञानाच्या काळात विकासाच्या संकल्पना, माध्यमे बदल आहेत. अशा या काळात महसूल विभाग अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी जनसेवेवर भर देऊन नागरिकांना सेवा देण्याचे काम अविरतपणे सुरू ठेवावे, असे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी आज येथे केले. 

महसूल दिनानिमित्त आजपासून ठाणे जिल्ह्यात आयोजित महसूल सप्ताहाच्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. शिनगारे बोलत होते. या सप्ताहाच्या शुभारंभ अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाय यांच्या हस्ते झाला.  यावेळी अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, विजयानंद शर्मा, जयराज कारभारी, रामदास दौंड, जिल्हा भूमीअभिलेखचे अधिक्षक बाबासाहेब रेडेकर, तहसीलदार अक्षय ढाकणे, अंबरनाथचे तहसीलदार प्रशांती माने, नारायण राजपूत, आदी यावेळी उपस्थित होते. शहापूर येथे आज सकाळी झालेल्या क्रेन कोसळून मृत्यू पडलेल्या कामगारांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. 

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे म्हणाले की, वर्षभरात महसूल विभागातील विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामांचे, मेहनतीचे कौतुक करण्याचा महसूल दिवस हा एक कार्यक्रम आहे. या वर्षी महसूल दिन हा महसूल सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे. कोणत्याही आपत्ती अथवा शासकीय उपक्रम, कार्यक्रम असो, प्रत्येक ठिकाणी सर्वात आधी महसूल विभाग पोचलेला असतो. कोणत्याही काळात नेहमीच आघाडीवर असणाऱ्या या कुटुंबाचा घटक म्हणून मला या विभागाचा अभिमान आहे. 

*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार*

गेल्या वर्षभरात विविध उपक्रम, योजना राबवून जिल्ह्यातील महसूल, जिल्हा निबंधक, जिल्हा भूमिअभिलेख विभागातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील एकूण 67 अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी, तहसीलदार राहुल सारंग, भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांच्यासह नायब तहसीलदार, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी, शिपाई, कोतवाल यांचा सत्कार करण्यात आला. 

शहापूर दुर्घटनेच्या ठिकाणी तातडीने पोहचून बचाव कार्य सुरू केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी रेवती गायकर, उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार कोमल ठाकूर यांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला. या तिघांच्या वतीने प्रातिनिधीक स्वरुपात श्रीमती गायकर यांचा सत्कार करण्यात आला. 

No comments:

Post a Comment

कोकणच्या कला संस्कृतीला वाव देण्यासाठी सुवर्ण-भास्कर नमन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरणचे २३ जुलैला मुंबई येथे आयोजन !!

कोकणच्या कला संस्कृतीला वाव देण्यासाठी सुवर्ण-भास्कर नमन स्पर्धा २०२५ च्या बक्षीस वितरणचे २३ जुलैला मुंबई येथे आयोजन !! ** शिवसेना नेते, वि....