Tuesday, 1 August 2023

कलगीतुरा" कलेची आज मुंबईतील दामोदर नाट्यगृहात पाहण्यासारखी जुगलबंदी ; नमन लोककला ( रजि.) संस्थेतर्फे बहारदार आयोजन !

कलगीतुरा" कलेची आज मुंबईतील दामोदर नाट्यगृहात पाहण्यासारखी जुगलबंदी ; नमन लोककला ( रजि.) संस्थेतर्फे बहारदार आयोजन !

रसिक मनपटलावर अधिराज्य गाजविणारे कोकणातील लोकप्रिय कलावंत ; कवी/गायक/शाहीर प्रकाश पांजणे विरूद्ध कवी/लेखक/शाहीर विकास लांबोरे

 मुंबई - ( दिपक कारकर )


"लोककलेची पंढरी कोकण होय" ! कोकणातील अनेक समृध्द लोककला आज बहुप्रिय ठरल्या आहेत.आजही शासन दरबारी कलावंत आणि लोककला ह्यांना न्याय नसला तरीही,ही मंडळी आपली अंगीकृत कला सादर करण्यासाठी तळमळीने कार्य करते.अशा कोकणातील लोककला व लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असणारी नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र-भारत) रजि.मध्यवर्ती मुबंई ह्या संस्थेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेत "चला बनुया लोककलेतून लोककलावंतांचा आधार" अशी साद घालत आज मंगळवार दि.१ऑगस्ट २०२३ रोजी रात्रौ -८.वा. दामोदर नाट्यगृह परेल, मुबंई -१२ येथे, कलगी-तुरा नाचाचा जंगी सामन्याचे आयोजन करण्यात आले असून कोकणातील सुप्रसिद्ध शाहीर,सुरांचा जादूगार शक्तीवाले शाहीर-प्रकाश पांजणे सह मधुकर यादव शाखा-आई चंडिका देवी नृत्य कलापथक (परचुरी-संगमेश्वर) आणि शब्दांचा किमयागार अशी सर्वदूर ख्याती असणारे शाहीर-विकास लांबोरे सह विशाल लांबोरे शाखा- नवलाई नाच मंडळ,विवळी- केळंबे (धनगरवाडी) ता.लांजा, रत्नागिरी अशा दोन लोकप्रिय शाहिरांची ही जुगलबंदी, हा जंगी सामना होणार आहे. सदर नाच कार्यक्रमावर गुहागर तालुक्यातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तसेच असोरे गाव विकासाचे जनक, जेष्ठ नमन लोककलावंत "शांताराम घडशी" यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नमन लोककला संस्थेचा विशेष "जीवन गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात येणार आहे. कोकण आणि कोकणातील लोककला येथील जनमानसांचा खरा श्वास, आपल्या जीवनात रंग भरण्याची किमया इथल्या लोककला व लोककलावंतानी केली.आपण या रंगात नेहमीच रंगून जातो, तालासुरात दंगुन जातो, परंतु त्याच बरोबर आपण रसिक म्हणून आपली एक नैतिक जबाबदारी सुद्धा बनते, या लोककलांचा आस्वाद घेता घेता लोककलावंतांच्या जीवनात देखील रंगाचे तुषार उधळता आले तर ते आपले भाग्यच आणि म्हणूनच नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र भारत) रजि.ह्या संस्थेने लोककलावंतांसाठी एक पाऊल पुढे येण्याचा निर्धार करत सर्वांच्या सहकार्यातून आणि योगदानातून लवकरच कलावंतांचा गौरव करणार आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन केले असून यातून संकलित होणारा निधी हा लोककलावंतांच्या हितासाठी,त्यांचा यथोचित गौरव करण्यासाठी म्हणून खर्ची घातला जाणार आहे याच उदात्त हेतूने आम्ही तमाम कलाप्रेमी रसिकांना कार्यक्रमासाठी विनम्रता पूर्वक निमंत्रित करीत आहोत, अधिक माहितीसाठी- सुधाकर मास्कर- ८८५००९९०९० उदय दणदणे-८२७५६२७६३६ रमाकांत जावळे- ९७०२३३३८६३ पिंकेश बापर्डेकर-८२९१५२७३४७ ह्या प्रतिनिधींकडे संपर्क साधावा असे आवाहन नमन लोककला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष रवींद्र मटकर, महासचिव शाहिद खेरटकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अग्निसुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !!

उरणमध्ये शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अग्निसुरक्षा प्रशिक्षण उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद !! *** २० युवकांना मिळाला थेट लाभ ; रोजगाराचा...