Tuesday, 1 August 2023

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या- प्रदिप वाघ

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या- प्रदिप वाघ

जव्हार, जितेंद्र मोरघा :

जव्हार मोखाडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे भात शेती व इतरही पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. नदी नाल्या समोर असलेली शेतात मातीचा भर गेल्याने भात बुजुन गेलेली आहेत. सतत पाणी साचल्याने भात शेती कुजुन गेली आहे, पुराच्या पाण्याने शेतात माती दगड आले आहेत.

आधीच उशिरा पाऊस आणि आता अतिवृष्टी मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. भाता बरोबर तुर, उडीद,खुरासणी या पिंकाना देखील मोठा फटाका बसला आहे.

प्रशासनाने भात शेती पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी मोखाडा पंचायत समिती चे उपसभापती प्रदीप वाघ यांनी शासनाकडे पत्र देऊन केली आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...