Friday, 18 August 2023

सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे खेळाडू दक्षिण कोरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना !!

सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे खेळाडू दक्षिण कोरियात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

               मुंबईतील सिद्धकला तायक्वांदो अकादमी १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तायक्वांदो वॉन, जेलबोक-डो, मुजू, दक्षिण कोरिया येथे १६ व्या जागतिक तायक्वांदो सांस्कृतिक प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पुमसे आणि कुरोगी स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधित्त्व करण्यासाठी दक्षिण कोरियाला रवाना झाली आहे. या संघा मध्ये युनिव्हर्सल हायस्कूल दहिसर - तनिष्का वेल्हाळ जानकीदेवी पब्लिक स्कूल - आरव चव्हाण, आर्या चव्हाण, अवनी चव्हाण, अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे - समायरा जोशी, शिवांश जोशी, ओबेरॉय इंटरनॅशनल स्कूल - निमांश चंडोक समर्थ चंडोक जमनाबाई नरसी स्कूल - दियान मेहता, निलोदय राज, व्योम बन्सल, जे.बी.सी.एन. इंटरनॅशनल स्कूल चेंबूर - ईसा काझी, इब्राहिम काझी, कारमेल हायस्कूल पेण (रायगड)- पूर्वेश म्हात्रे आणि वरिष्ठ वयोगटात निशांत शिंदे, विक्रांत देसाई, यश दळवी, चंदन परिडा, स्वप्नील शिंदे, फ्रँक कानडीया, या भारतीय महासंघासह सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे मुख्य प्रशिक्षक जयेश वेल्हाळ संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या स्पर्धेसाठी प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक निशांत शिंदे, विक्रांत देसाई, यश दळवी, चंदन परिडा, स्वप्नील शिंदे, फ्रँक कानडीया, कृपेश रणक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ३ ते ४ महिने मुंबई विभागीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. सिद्धकला तायक्वांदो अकादमीचे खेळाडू दिवसाचे चार तास प्रशिक्षण आणि व्यायाम करत होते.

No comments:

Post a Comment

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून घरेलु महिला कामगार योजना नांदणी !

स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून घरेलु महिला कामगार योजना नांदणी ! कल्याण, प्रतिनिधी -‌महाराष्ट्र शासनाची घरेलु महिला कामगार योजना न...