Friday, 18 August 2023

स्मिता रोहित शिंदे यांची मुंबई महिलाध्यक्ष पदी नियुक्ती !!

स्मिता रोहित शिंदे यांची मुंबई महिलाध्यक्ष पदी नियुक्ती !!

नवीमुंबई (प्रतिनिधी) - समाजातील विविध समस्यांवर आवाज उठवणारी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी संघटना *स्वतंत्र संपादक पत्रकार संघ* या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार *नामदेव शेलार* यांच्या मान्यतेने संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष *गौरव शेलार* यांनी अभ्यासु समाजसेविका *स्मिता रोहित शिंदे* यांची मुंबई महिला जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. 

संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक *महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत* यांचे हस्ते स्मिता शिंदे यांना नियुक्ती पत्र प्रदान करुन त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सदर प्रसंगी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाचे  राज्य संघटक *सागर शिंदे,* राज्य सहसचिव *रोहित शिंदे,* जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष *शशिकांत बेडेकर,* उपाध्यक्ष *ज्ञानेश्वर नारायने* सहसचिव *विजय ढाले,*  सचिव *तुकाराम पवार,* *गणेश बेडेकर*  इत्यादी मान्यवर उपस्थित होते. स्मिता शिंदे यांच्या नियुक्तीने समाजातील विविध स्तरातुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

अकोले - परेल या एस.टी बसने घेतला अखेरचा श्वास, प्रवासी नाराज...!

अकोले - परेल या एस.टी बसने घेतला अखेरचा श्वास, प्रवासी नाराज...! अकोले, विशाल कुरकुटे -       महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा गल...