राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता !!
पुणे, प्रतिनिधी : राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा पुढे सरकत असून आज संध्याकाळी तो बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पाऊस पुन्हा एकदा धो धो कोसळण्याची शक्यता आहे. बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मंगळवारी संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासांत पश्चिम बंगालमधील गंगा नदीचे खोरे ओलांडण्याची शक्यता आहे. याचा परिणाम राज्यातील हवामानावर होणार असून पुढील चार पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरीसह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment