गौरीपाडा प्रभागात अनेक सोसायटीमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा !
*स्मार्ट सिटीच्या फक्त गप्पाच पाण्याचे नियोजन शुन्य, लाखो करोडो रूपयांच्या कराची उधळपट्टी*
कल्याण, प्रतिनिधी : गौरीपाडा प्रभागातील विविध सोसायटीमध्ये पाण्याचा कमी दाबाने पुरवठा होत असून नागरिक अक्षरशः पाण्याच्या तुटवड्यामुळे महिला जेष्ठ सर्व नागरिक हैराण झालेले आहेत लाखो, करोडो रूपयांचा कर गोळा करणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्मार्ट सिटी फुशारक्या मारणारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना अजून नागरीकांना मुलभूत सुविधा देता येत नाही. गौरीपाडा प्रभागातील अनेक सोसायटीमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे टँकरच्या पाण्याची किंमत १५०० रुपये तेही कोणतीही पावती न घेता संबंधित सोसायटीतील पदाधिकारी यांनी संपर्क केल्यानंतर ही बाब स्फूर्ती फाउंडेशन च्या लक्षात आणून दिली त्यानुसार संबंधित पाणीपुरवठा विभागाला पत्र देण्यात आलेले असून तत्काळ ही समस्या सुटली पाहिजे अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने संबंधित पाणीपुरवठा विभागाकडे केली गेलेली आहे यावर पाणीपुरवठा करून लवकरात लवकर मार्ग काढण्याच्या आश्वासन देण्यात आलेले आहे पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहे.
*स्मार्ट सिटीच्या फक्त गप्पा होतात खऱ्या अर्थाने मूलभूत सुविधांपासून अजूनही कल्याण मधील नागरिक वंचित आहे खड्डे पडलेले रस्ते, पाणी, गटारे, या सुविधा अजूनही काही भागांमध्ये व्यवस्थितरित्या पोहोचलेल्या नसून स्मार्ट सिटीच्या फक्त चर्चा आणि गप्पा करत आहोत वास्तव हे वेगळे आहे , लोकसंख्या वाढत आहे, त्यानुसार काही पाण्याचे नियोजन व प्लॅन आहे का ? लाखो करोडो रूपयांचा कर कुठे जातो जर पाण्यासाठी नागरीकांना टॅंकर बोलवावा लागतो?आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाला सांगू इच्छितो आपण त्वरित या समस्येकडे गांभीर्याने घेऊन तत्काळ सोडावी अन्यथा महिलांचा हंडा मोर्चा हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर धडकेल त्याची सर्व जबाबदारी पाणीपुरवठा विभागाची असेल*
बजरंग शांताराम तांगडकर
अध्यक्ष -स्फूर्ती फाऊंडेशन
शिल्पा बजरंग तांगडकर
महिला प्रमुख -स्फूर्ती फाऊंडेशन
No comments:
Post a Comment