Tuesday, 15 August 2023

मुंबई गोवा महामार्गावरील कासु ते इंदापूर सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल -- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

मुंबई गोवा महामार्गावरील कासु ते इंदापूर सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल
 -- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

रायगड, दि. 15-- मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या 42 किलोमीटरच्या टप्प्यापैकी 23 किलोमीटरचे सिंगल लेनचे  काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जोमाने सुरू आहे हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के पूर्ण होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबई ते गोवा या महामार्गाची पाहणी केली. पनवेल पासून सुरू झालेला मंत्री चव्हाण यांचा दौरा सिंधुदुर्गातील झाराप येथे संपला. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाचे बहुतांश काम जवळजवळ पूर्ण झाले आहे कशेडी घाटाचे काम कामांमधील सिंगल लेन व परशुराम घाटाचा रस्ताचे कामही जोमाने सुरू आहे.

मुंबई गोवा पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले की, मुंबई - गोवा महा‌मार्ग ५५० कि. मी. चा रस्ता आहे. या महामार्गाचे काम वेगवेगळ्या १० पकेजेस सुरू आहेत.

पहिल्या टप्प्यातील पनवेल ते कासू या ४२ कि. मी. पैकी २२ कि. मी. सिंगल लेन काम पूर्ण झालेले आहे. या रस्ते बांधणीच्या कामासाठी नव्याने तंत्रज्ञानाचा  वापर करण्यात आला आहे ९ मीटरच्या असणारया पेवर तंत्रज्ञानाच्या सहाय्याने काम चालत आहे. पेवर जवळ जवळ एका दिवसामध्ये ९०० मीटर काम होत आहे. आज मुंबई -गोवा महामार्गावर पहिल्या पॅकेजमध्ये २ पेवर मशीन्स काम करत आहेत. पहिल्या टप्यामध्ये साडेचार मीटरचे दोन पेवर काम करत आहेत. पुढच्या टप्प्यामध्ये असेच दोन पेवर काम करत आहेत. या कामासाठी एक टार्गेट आहे, एक मशीन दर दिवशी कमीत कमी १ कि.मी. आणि जास्तीत जास्त १.५. कि. मी. रस्त्याचे या पेवरच्या माध्यमातून काम सुरू आहे. 

पावसाने साथ दिली पाहिजे अशी आम्हीही प्रार्थना करत आहोत, पण जरी पावसाने साथ दिली नाही व रिमझिम पाऊस पडला तरी यामध्ये काम करता येऊ शकतं. त्या पद्धतीने काम आता सुरू आहे. खात्री आहे की, मुंबई - गोवा महामार्गाचं सिंगल लेनचे काम येत्या गणपती पूर्वी नक्की पूर्ण होईल असा विश्वास मंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

कोकणचे सुपुत्र मोहन कदम, श्रीराम वैद्य, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !!

कोकणचे सुपुत्र मोहन कदम, श्रीराम वैद्य, दीपक फणसळकर, शांताराम गुडेकर, केतन भोज "कोकण रत्न- २०२५ मानद पदवी पुरस्काराने सन्मानित !! ...