रायगड जिल्ह्याचा शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरु
--उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील
*अलिबाग पोलिस परेड मैदानावर मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न*
अलिबाग, जि.रायगड दि.15 - विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधन्य दिले आहे. रायगड जिल्ह्याचा शाश्वत व नियोजनबद्ध पद्धतीने विकास सुरु आहे. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच जिल्ह्याचा विकास साध्य होणार आहे यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदिय कार्य, मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज येथे केले.
स्वातंत्र्यदिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड मैदानावर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्तेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आमच्या मंत्रीमंडळाचे काम सुरु आहे. आज राज्यातील शेतकरी -कष्टकरी यांचा आर्थिक आधार बळकट करणे, आपत्तीच्या काळात या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे या बाबींना महत्व दिले जात आहे. विविध योजनांची प्रभावी पद्धतीने अंमलबजावणी करुन मदतीचा हात वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यावर आमचा भर आहे. राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पातून ही बाब ठळकपणे अधोरेखीत झाली आहे. बळीराजा हा या राज्याचा महत्वाचा घटक. त्याच्या हितासाठी, प्रगतीसाठी राज्य शासन सदैव कार्यरत आहे.
ध्वजारोहणानंतर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस तसेच शासकिय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा, सामाजिक संस्थांचा व व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे :-
राखीव पोलीस निरीक्षक विजय रंगनाथ बाविस्कर गुणवत्तापुर्ण सेवेबद्दल पोलीस पदक मिळाल्याबद्दल, ७१ वी आखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पधेत प्राप्त सुवर्ण पदक विजेते पोलिस शिपाई कुशल सोमलींग बनसोडे , पोलिस शिपाई प्रियांका अर्चित भोगांवकर आणि कारागृह विभाग २०२२-२३ या वर्षाकरिता प्रशसनीय सेवेबद्दल अशोक दगडू चव्हाण व मधुकर विष्णु कांबळे, शालेय स्तरावरील विविध परीक्षमधील यशासाठी मयंक अमोल भोसले (इ. 6 वी), नैसर्गिक आपत्तीमधील सहकार्य व मदतीसाठी अपघातांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ रामचंद्र साठलेकर व विजय भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच कु. कस्तूरी नरेंद्र भालवलकर, कु.आरवी नरेंद्र भालवलकर, कु. आरोही मोनिष कटोर, कु. मोनिष्का मोनिष कटोर यांना माझी कन्या भाग्यश्री पात्र लाभार्थी मुदत ठेव वाटप करण्यात आले. तसेच उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राथमिक शिक्षक श्री संदीप वारगे आदींचा मंत्रीमहोदयांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment