स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. अमित रेवाळे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप !!
कोकण, (शांताराम गुडेकर) :
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधली मु.पो. आंगवली गावचे सुपुत्र, प्रसिद्ध व्यवसायिक व स्वयंभू मार्लेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक/अध्यक्ष श्री.अमित मनोहर रेवाळे यांनी आंगवली गावातील जिल्हा परिषद शाळा रेवाळेवाडी व मराठी शाळा आंगवली या शाळेतील विद्यार्थी वर्गाला पेन,चित्रकला वही, कलर, ब्रश असे इ. शैक्षणिक साहित्य वाटप केले.
अमित रेवाळे यांनी यानिमित्ताने मत व्यक्त करताना सांगितले की, आपण शिक्षण घेत असताना गरिबीमुळे अशा आवश्यकता असलेल्या वस्तू मिळत नसल्याने खूप त्रास सहन करावा लागला होता. पुरेसे शालेय साहित्य मिळत नसतानाही त्या परिस्थितीवर मात करून इ. १ ते इ.७ वीपर्यंत मी प्रथम क्रमांक पटकावला होता.अशा एक नाही तर अनेक आठवणी जाग्या होवून ते भावूक झाले. तसेच आपल्या गावांतील कोणताही विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी सर्वोत्तर प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.या प्रसंगी शाळेतील शिक्षक श्री.शिंदे सर, मॅडम, गावातील ग्रामपंचायत सदस्य सौ. अमिता आत्माराम रेवाळे, तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment