Tuesday, 15 August 2023

डॉ.रोहिदास दुसार यांचा रोहा तालुक्यांतील तमाम कुणबी समाज बांधवांच्यावतीने मानपत्रसह नागरी सत्कार !

डॉ.रोहिदास दुसार यांचा रोहा तालुक्यांतील तमाम कुणबी समाज बांधवांच्यावतीने मानपत्रसह नागरी सत्कार !

कोकण, (शांताराम गुडेकर) :
             पोलिस सेवेत असतानाच साहित्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले डॉ. रोहिदास नारायण दुसार यांना पी एच डी प्रदान करण्यात आल्यानंतर रोहा तालुक्यांतील तमाम कुणबी समाज बांधवांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार आणि मानपत्र प्रदान करण्याचा आगळा वेगळा कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुंबईत पार पडला.यावेळी चंद्रकांत मोरे (अवर सचिव, मंत्रालय), शांताराम सालप (माजी चिटणीस कुणबी समाजोन्नती संघ मुंबई), पी.डी. ठोंबरे (संचालक कुणबी सहकारी बँक), गणेश भगत (अध्यक्ष कुणबी शेतकरी प्रतिष्ठान रोहा), हरिश्चंद्र पाटील (सह चिटणीस कुणबी समाजोन्नती संघ), हरीश पवार (उपाध्यक्ष रोहा शाखा), भास्कर पवार (सेक्रेटरी रोहा शाखा), रविंद्र सावंत (प्रतिनिधी कुणबी विद्यार्थी वसतिगृह आजी माजी विद्यार्थी परिषद मुंबई) आदी उपस्थित होते.

           डॉ.दुसार यांची आतापर्यंत एकूण १६ पुस्तके प्रकाशित झाली असून पोलिस प्रशिक्षण आणि प्रशासन याबाबत त्यांनी संशोधक विषयावर २५ वर्षे सखोल अभ्यास केला. मुंबई विद्यापीठ येथे पी.एचडी प्रबंध सादर केला. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील बहुआयामी कामाचे कौतुक करण्यासाठी रोहा तालुक्यांतील तमाम कुणबी समाज बांधवांच्या वतीने कुणबी ज्ञाती गृह, परेल मुंबई येथे सत्कार सोहळा पार पडला. पोलिस सेवेत असतानाच साहित्य क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले डॉ. रोहिदास नारायण दुसार यांना पी.एचडी प्रदान झाल्याबद्दल आणि रोहा तालुक्यांतील तमाम कुणबी समाज बांधवांच्यावतीने त्यांचा मानपत्रसह नागरी सत्कार झाल्याबद्दल अनेकांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...