समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या सौ.रूचिता नाईक यांना जीवनगौरव पुरस्कार .....
वसई , प्रतिनिधी : टॉप 10 महाराष्ट्र न्युज चा प्रथम वर्धापन दिनानिमित्त समाजकार्यात भरीव कामगिरी करणाऱ्या रूचिता नाईक यांना टॉप टेन महाराष्ट्र न्युज च्या वतिने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
एक महिला आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर खूप काही करु शकते हे जिवंत आणी ज्वलंत उदाहरण म्हणजे रूचिता नाईक आहेत. यांनी आपल्या विचारांतून व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा माध्यमातुन एक समाजसेवेची ज्योत प्रोज्योलित करुन आज ही ती अखंड पणे सुरुच ठेवली आहे.
कोरोना सारख्या महामारीत हजारो नागरीकांना मोफत अन्नधान्य, स्टीम वेपोराईझर मशिन, व इतर साहित्य वाटप केले. 200 महिलांना जिजाऊ संस्थेचा माध्यमातुन मेहंदी व ब्युटी पार्लर प्रशिक्षण दिले. दिव्यांग बांधवांना मोफत साहित्य व पेन्शन मिळवुन दिली.
संजय गांधी योजने मधुन विधवा महिलांना दर महिना पेन्शन सुरू करून दिली. तहसिलदार येथुन गरीब गरजू नागरीकांना मोफत दाखले उपलब्ध करून देण्यात आले.
शेकडो नागरीकांचे मोतीबिंदु शस्त्रक्रिया करून देण्यात आली.
शिवसेना कार्यालयात दर महिन्याला आधार कार्ड शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर, मोफत आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड नागरीकांचे शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले.
महिलांवरील अत्याचार थांबावे यासाठी विशाखा समिती स्थापन करण्याबाबत महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांच्याकडे सतत पाठपुरावा करत आदेश काढले.
समेळगाव स्मशानभूमीतील लाकडे ठेवण्यासाठी शेडचे काम केले.
सोपारा सामान्य रुग्णालयातील भरती व साहित्य हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करून दिले. दरवर्षी पावसामुळे घरात पाणी शिरलेल्या नागरीकांना शासना कडुन मदत मिळवुन दिली. पाणी समस्या, अनधिकृत बांधकाम, नैसर्गिक नाले, रस्त्यावरील खड्डे अनधिकृत मोबाईल टॉवर , अशा अनेक समस्या शिवसेना महिला शहर प्रमुख रूचिता नाईक यांनी मार्गी लावले. यासाठी आमरण उपोषण हि केले होते.
शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केलेल्या भरीव कामगिरीची टॉप 10 महाराष्ट्र न्युज ने दखल घेत त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. बदलत्या काळानुसार विविध क्षेत्रांमध्ये महिला प्रभावी कामगिरी करत असून, समाजकार्य व राजकारणात जास्तीत जास्त महिला सक्रियपणे सहभागी झाल्यास महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होईल, असे प्रतिपादन शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केले.
यावेळी कैलास पाटील, उपाध्यक्ष आगरी सेना महाराष्ट्र, जन्या मामा शिवसेना, सुदेश चौधरी शिवसेना तालुकाप्रमुख, मयुरेश वाघ समाजसेवक, हितेश जाधव प्रहार संघटना, मनोज पाटील भाजपा, मनिष वैद्य शिवसेना उपतालुकाप्रमुख, मनोज बारोट हे मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment